केगाव येथे कुस्ती स्पर्धा समाधान घोडके-नितीन केचे यांची कुस्ती बरोबरीत

By Admin | Published: August 26, 2015 12:18 AM2015-08-26T00:18:58+5:302015-08-26T00:18:58+5:30

सोलापूर: केगाव वॉर्ड क्रमांक 1 येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी समाधान घोडके व नितीन केचे यांच्यातील प्रथम क्रमांकाची कुस्ती अध्र्या तासानंतर बरोबरीत सुटली़ विजेत्यांना विभागून प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आल़े तसेच विविध गटातील कुस्ती स्पर्धेत दादा सरवदे, मनोज घोडके, दिगंबर रोडगे, राणू दोरकर, सौरभ इगवे हे विजयी झाल़े यावेळी लहान-मोठय़ा अशा 60 कुस्त्या झाल्या़ या स्पर्धेसाठी 100 रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंत मानधन म्हणून विजयी मल्लांना देण्यात आल़े

Ghogeko-Nitin Keke wrestled wrestling wrestling competition in Kegaon | केगाव येथे कुस्ती स्पर्धा समाधान घोडके-नितीन केचे यांची कुस्ती बरोबरीत

केगाव येथे कुस्ती स्पर्धा समाधान घोडके-नितीन केचे यांची कुस्ती बरोबरीत

googlenewsNext
लापूर: केगाव वॉर्ड क्रमांक 1 येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी समाधान घोडके व नितीन केचे यांच्यातील प्रथम क्रमांकाची कुस्ती अध्र्या तासानंतर बरोबरीत सुटली़ विजेत्यांना विभागून प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आल़े तसेच विविध गटातील कुस्ती स्पर्धेत दादा सरवदे, मनोज घोडके, दिगंबर रोडगे, राणू दोरकर, सौरभ इगवे हे विजयी झाल़े यावेळी लहान-मोठय़ा अशा 60 कुस्त्या झाल्या़ या स्पर्धेसाठी 100 रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंत मानधन म्हणून विजयी मल्लांना देण्यात आल़े
या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री विजयकुमार देशमुख व शिवाजी पिसे यांच्या हस्ते झाल़े यावेळी बाबू सुरवसे, अफसर शेख, काका पवार, अस्लम काझी आदी उपस्थित होत़े पंच म्हणून मारूती इगवे, बाबा चव्हाण, साधू सुरवसे, रमेश चव्हाण, राहुल सरवदे, दत्ता कोलारकर, अस्लम काझी यांनी काम पाहिल़ेयासाठी नागनाथ पाटील, अमोल पाटील मित्र मंडळ मधू इगवे, सुभाष चौगुले, उद्धव भोसले, शिवा भोसले आदींनी पर्शिम घेतल़े (क्रीडा प्रतिनिधी)
फोटोओळी=
केगाव वॉर्ड क्रमांक 1 च्या वतीने आयोजित कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख़ त्यावेळी बाबू सुरवसे, अफसर शेख, काका पवार, अस्लम काझी आदी़

Web Title: Ghogeko-Nitin Keke wrestled wrestling wrestling competition in Kegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.