फिफाच्या अध्यक्षपदी गियानी इन्फॅन्टिनो
By admin | Published: February 26, 2016 10:54 PM2016-02-26T22:54:11+5:302016-02-27T05:03:20+5:30
जागतिक फुटबॉल संस्था (फिफा)च्या अध्यक्षपदाच्या शर्यतील युरोपचे गियानी इन्फॅन्टिनो यांनी बाजी मारली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
झुरिच, दि. २६ - जागतिक फुटबॉल संस्था (फिफा)च्या अध्यक्षपदाच्या शर्यतील युरोपचे गियानी इन्फॅन्टिनो यांनी बाजी मारली आहे.
फिफा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत गिलानी इन्फॅन्टिनो यांच्यासह पाच जणांमध्ये ही लढत होती. मात्र फिफा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत खरी लढत युएफाचे सरचिटणीस गिलानी इन्फॅन्टिनो आणि आशियाई फूटबॉल संघाचे नेते शेख सलमान यांच्यात होती. अखेर यामध्ये गिलानी इन्फॅन्टिनो यांनाच बहुमत मिळाल्याने फिफाच्या अध्यक्षपदी त्यांचीच निवड करण्यात आली. फिफा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात गिलानी इन्फॅन्टिनो यांना २०७ पैकी ११५ मते मिऴाली. तर आशियाई फूटबॉल संघाचे नेते शेख सलमान यांनी ८८ मते मिऴाली. प्रिन्स अली यांना चार तर जेरोमी कॅम्पेन यांना एकही मत मिळाले नाही.