वाढदिवशी जिम्नॅस्ट दीपा कर्माकर नजरकैदेत

By Admin | Published: August 9, 2016 10:49 AM2016-08-09T10:49:17+5:302016-08-09T11:34:14+5:30

52 वर्षांनंतर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली आणि एकमेव भारतीय महिला आर्टिस्टिक जिम्नॅस्ट दीपा कर्माकरला वाढदिवशी नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे

GIMNEST Deepa Karmakar Narkarkade on Birthday | वाढदिवशी जिम्नॅस्ट दीपा कर्माकर नजरकैदेत

वाढदिवशी जिम्नॅस्ट दीपा कर्माकर नजरकैदेत

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
रिओ दि जानेरो, दि. 9 - 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली आणि एकमेव भारतीय महिला आर्टिस्टिक जिम्नॅस्ट दीपा कर्माकरचा आज वाढदिवस आहे. मात्र तिला वाढदिवसाचं कोणतही सेलिब्रेशन करण्याची परवानगी नसून तिला नजरैदेत ठेवण्यात आलं आहे. यामागचं कारण म्हणजे दीपा कर्माकरने व्हॉल्ट प्रकारात अंतिम फेरी गाठली असल्याने तिला नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. जिम्नॅस्टिक्‍सच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी दीपा कर्माकर पहिली भारतीय महिला ठरली आहे.
 
दीपाचा आज 23वा वाढदिवस आहे. प्रशिक्षकांनेी नजरकैदेत ठेवलं असल्याने कोणालाही दीपाला भेटण्याची परवानगी नाही.  दीपा 14 ऑगस्टला व्हॉल्टमध्ये अंतिम फेरीत खेळणार आहे. त्यापूर्वी तिला कोणीही भेटी नये यासाठी प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांनी तिला नजरकैदेत ठेवलं आहे. दीपाला केवळ तिचे आईवडील वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतील.
 
'दीपाच्या मोबाईलमधून सिम कार्डदेखील काढून टाकण्यात आलं आहे. फक्त तिच्या आई-वडिलांना शुभेच्छा देण्याची मुभा देण्यात आली आहे', असं प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांनी सांगितलं आहे.
 
1964 नंतर दीपा ही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी देशातील पहिली महिला जिम्नॅस्ट आहे. कोट्यवधी भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असल्यास खेळाच्या या महाकुंभात भरीव कामगिरी करावी लागेल, याची जाणीवदेखील दीपाला आहे.
 
जिम्नॅस्टिकमध्ये एकमेव भारतीय म्हणून खेळणार असल्यामुळे हे माझ्यासाठी कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नसल्याचे दीपाने रिओच्या ऑलिम्पिकआधी म्हटले होते. पूर्वोत्तर भागातील असणाऱ्या दीपाने कठोर परिश्रम आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली आहे. बालपणीच पाय सपाट असल्यामुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते.
 

Web Title: GIMNEST Deepa Karmakar Narkarkade on Birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.