सचिननंतर विराट कोहलीला 'भारतरत्न' द्या....
By admin | Published: June 26, 2016 10:00 AM2016-06-26T10:00:58+5:302016-06-26T11:01:50+5:30
टीम इंडिया कसोटी संघाचा कर्णधार आणि सध्याचा सर्वांत लोकप्रिय फलंदाज विराट कोहलीला भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करावा अशी मागणी केली जात आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ : क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईत असलेला टीम इंडिया कसोटी संघाचा कर्णधार आणि सध्याचा सर्वांत लोकप्रिय फलंदाज विराट कोहलीला भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करावा अशी मागणी केली जात आहे. ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनतर्फे विराट कोहलीचा 'भारतरत्न'ने गौरव करण्याची मागणी झाली आहे. भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीकडून तमाम क्रिकेट चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत.
तडाखेबाज खेळीमुळे जगभरातील क्रीडारसिकांच्या गळ्यातील ताईत झालेल्या विराटला सचिननंतर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी AIGF (ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन) तर्फे केली जात आहे. AIGFने याबाबत गृहमंत्री राजनाथ सिंह यांना आवेदन दिले आहे. याबाबतचे ट्विट त्यांनी आपल्या ट्विटरवर केले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासारखीच कोहलीची कामगिरीही विराट असल्याचं सांगत काही बाबतीत विराट अव्वल ठरत असल्याचंही या पत्रात म्हटलं आहे.
#Virat4BharatRatna#ViratKohli#BharatRatna#youthicon#aigf#AllIndiaGamingFederation@imVkohlipic.twitter.com/fJYWz2XrMp
— AIGF (@aigfmumbai) June 21, 2016
फक्त भारतातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही विराटने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. टी20 विश्वचषकातील त्याच्या कामगिरीची दखल जागतिक पातळीवर घेतली आहे. कोहलीचा बॅटिंग अॅव्हरेज जगात उत्तम असल्याचंही फेडरेशनने नमूद केलं आहे. क्रिकेट हा भारतात लोकप्रिय खेळ असल्यामुळे विराटला ह्यभारतरत्नह्ण देऊन त्याचा गौरव केंद्र सरकारने करावा, असंही पत्रात म्हटलं आहे. ही मागणी मान्य झाल्यास ह्यभारतरत्नह्णने सन्मानित केला जाणारा विराट हा दुसरा क्रीडापटू ठरेल.