भारताचं राष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षकपद व्हेटोरीला द्या, कोहलीची शिफारस

By admin | Published: May 9, 2016 07:35 PM2016-05-09T19:35:07+5:302016-05-09T19:35:07+5:30

न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि स्पीनर डॅनियल व्हेटोरीची भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षणपदी निवड करावी, अशी मागणी विराट कोहलीनं केली

Give India national cricket coach Vettori, recommend Kohli | भारताचं राष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षकपद व्हेटोरीला द्या, कोहलीची शिफारस

भारताचं राष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षकपद व्हेटोरीला द्या, कोहलीची शिफारस

Next

ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. 9- न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि स्पीनर डॅनियल व्हेटोरीची भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षणपदी निवड करावी, अशी मागणी विराट कोहलीनं केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमचा विराट कोहली कॅप्टन असून, व्हेटोरी हा प्रशिक्षक आहे. कोहलीच्या मते भारताच्या प्रशिक्षकपदी डॅनियल व्हेटोरीच योग्य व्यक्ती आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार व्हिटोरीचं नाव कोहलीनं सुचवलं आहे. मात्र यावर बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही आहे. ग्रेग चॅपेल आणि ग्रे क्रिस्टन यांचीही याआधी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आल्याचं माहिती यावेळी कोहलीनं दिली आहे. गेल्याच वर्षीच व्हेटोरीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सध्या व्हेटोरी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा प्रशिक्षक आहे.
यंदा टीम इंडियाला 18 कसोटी सामने खेळायचे आहेत. कोहली भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे कोहलीच्या शिफारशीचा विचार होण्याची शक्यता आहे. व्हेटोरीने वन डे, कसोटी आणि टी ट्वेण्टी मिळून 442 सामन्यांमध्ये 705 बळी टिपले आहेत. वन डेमध्ये त्याने 295 सामन्यात 305 विकेट्स, तर 113 कसोटी सामन्यात 362 विकेट घेतल्या आहेत.

Web Title: Give India national cricket coach Vettori, recommend Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.