तेजा यांना द्रोणाचार्य द्या; अर्जुन पुरस्कार विजेत्यांचे राष्ट्रपतींना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:59 AM2018-09-21T01:59:10+5:302018-09-21T01:59:43+5:30
पुरस्कार मिळायलाच हवा’, अशी विनंती करणारे पत्र या खेळातील अर्जुन पुरस्काराचे मानकरी अभिषेक वर्मा आणि रजत चौहान यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिले आहे.
नवी दिल्ली: ‘तिरंदाजी प्रशिक्षक जीवनज्योतसिंग तेजा यांना द्रोणाचार्यपासून वंचित ठेवू नका, त्यांना हा पुरस्कार मिळायलाच हवा’, अशी विनंती करणारे पत्र या खेळातील अर्जुन पुरस्काराचे मानकरी अभिषेक वर्मा आणि रजत चौहान यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिले आहे.
न्या. मुकुल मुदगल यांच्या नेतृत्वाखालील पुरस्कार निवड समितीने द्रोणाचार्यसाठी तेजा यांच्या नावाची शिफारस केली होती, पण तेजा यांच्याविरुद्ध बेशिस्तीचे प्रकरण असल्याचे सांगून क्रीडा मंत्रालयाने बुधवारीच त्यांचे नाव वगळले.
पत्रात या खेळाडूंनी लिहिले,‘ तेजा यांनी भारतीय तिरंदाजीला नवी उंची गाठून दिली. २०१३ पासून भारतीय संघासोबत असलेले तेजा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आघाडीवर असतात. त्यांच्यावरील अन्याय तिरंदाजी खेळासाठी मोठा धक्का असेल. ’ या पत्राची एक प्रत क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांना देखील पाठविण्यात आली. (वृत्तसंस्था)
>२०१३ तेजा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आघाडीवर असतात. तिरंदाजांनी लिहिलेल्या पत्राची प्रत क्रीडामंत्री राठोड यांना पाठविली आहे.