महिला, दिव्यांग व्यक्तींना बरोबरीची संधी द्या
By admin | Published: April 3, 2017 12:45 AM2017-04-03T00:45:13+5:302017-04-03T00:45:13+5:30
महिला तसेच दिव्यांग व्यक्तींमध्ये यशस्वी होण्याची मोठी क्षमता असून, त्यांना उज्ज्वल भारत साकार होण्यासाठी बरोबरी साधण्याची संधी द्यावी
नवी दिल्ली : महिला तसेच दिव्यांग व्यक्तींमध्ये यशस्वी होण्याची मोठी क्षमता असून, त्यांना उज्ज्वल भारत साकार होण्यासाठी बरोबरी साधण्याची संधी द्यावी, असे अवाहन पॅरालिम्पियन दीपा मलिकने केले आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली दीपाने सांगितले की, ‘महिला व दिव्यांग व्यक्तींमध्येही गुणवत्ता असते. त्यांना घराच्या चार भिंतींमध्ये न ठेवता आपली स्वप्ने साकार करण्याची संधी आणि स्वातंत्र्य मिळायला हवे. त्यांना संधी आणि स्वातंत्र्य देणे महत्त्वपूर्ण आहे. एका देशाची प्रगती या गोष्टीवरुनही ठरवता येते की त्या देशात महिला आणि दिव्यांग व्यक्तींसह कशाप्रकारचे व्यवहार केले जाते.’
त्याचप्रमाणे, ‘महिला आणि दिव्यांग व्यक्तींना घरीच राहण्याचे सांगण्याऐवजी आपल्याला त्यांच्यासाठी सुरक्षित आणि अधिक सन्मानजनक वातावरण तयार करण्याची गरज आहे,’ असेही दीपाने सांगितले. रिओ पॅरालिम्पिकमध्ये गोळा फेक प्रकारात रौप्य पटकावणारी ४६ वर्षांची दीपा सर्वात वयस्कर आॅलिम्पियन आहे.
यानंतर माझा कमरेखालचा भागाला पक्षघात होईल आणि मी नंतर कधीही चालू शकणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.’ पक्षघातानंतर दीपाचे हात पुर्णपणे काम करीत
असून तीची मान थोडीफार हालचाल करत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच दीपाला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. (वृत्तसंस्था)
>मणक्यामध्ये झालेल्या दुखापतीमुळे दीपावर तब्बल २० शस्त्रक्रीया झाल्या होत्या. मात्र, यानंतरही तीच्या कमरेखालील भागाला पक्षघात झाला. २० शस्त्रक्रीया झाल्यानंतर मी दोन - तीन वर्ष पुन्हा सावरण्यासाठी कठोर मेहनत घेतली. यानंतर मी चालायला सुरुवात केली. बाईकर झाले, राज्यस्तरावर बास्केटबॉल खेळली आणि क्रिकेटरही बनले. - दीपा मलिक