आनंद संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी

By admin | Published: October 8, 2016 03:45 AM2016-10-08T03:45:51+5:302016-10-08T03:45:51+5:30

विश्वनाथन आनंद याने दहाव्या ताल मेमोरियल बुद्धिबळ स्पर्धेत शुक्रवारी येथे अर्मेनियाचा लेवोन आरोनियन याच्यासोबतची लढत बरोबरीत सोडवली.

GLAD jointly third place | आनंद संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी

आनंद संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी

Next


मॉस्को : पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद याने दहाव्या ताल मेमोरियल बुद्धिबळ स्पर्धेत शुक्रवारी येथे अर्मेनियाचा लेवोन आरोनियन याच्यासोबतची लढत बरोबरीत सोडवली. त्याचबरोबर, तो संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावर राहिला.
आनंदसाठी ही स्पर्धा संमिश्र यशाची ठरली. त्यात त्याला काही रेटिंग गुण मिळतील. या स्पर्धेत त्याने २ डाव जिंकले. एका डावात त्याला पराभव पत्करावा लागला आणि ६ डाव बरोबरीत सुटले.
आरोनियनविरुद्धची लढत चुरशीची झाली. तथापि, आनंद इटालियन ओपनिंगने विजयाच्या स्थितीत पोहोचू शकला नाही. या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी ४० चालींनंतर ड्रॉवर सहमती दर्शवली. रशियाच्या इयान नेपोमनियाचीने अखेरच्या
फेरीत इस्राईलच्या बोरिस गेलफंडविरुद्ध बरोबरी साधून विजेतेपद पटकावले. (वृत्तसंस्था)
त्यामुळे त्याला दोन लाख डॉलर बक्षीस रक्कम मिळाली. त्याने गेल्या चार फेऱ्यांत आघाडी मिळविली होती आणि अखेरपर्यंत ती कायम ठेवली. नेपोमनियाचीने स्पर्धेत ६ गुण नोंदविले आहेत आणि तो अनीस गिरीपेक्षा अर्ध्या गुणाने पुढे राहिला. त्याने चीनच्या ली चाओविरुद्ध विजयाची संधी गमावली. एक वेळ गिरी सुस्थितीत होता व तो विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरेल, असे वाटत होते; परंतु नेदरलँड्सच्या या खेळाडूला फायदा घेता आला नाही आणि अखेर त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. गिरीचे ५.५ गुण झाले. आरोनियन आणि आनंद प्रत्येक ५ गुणांसह संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत. रशियाचा व्लादिमीर क्रॅमनिक, पीटर श्वेडलर, ली चाओ आणि अझरबैजानचा शखरियार मामेदयारोव ४.५ गुणांसह संयुक्तरीत्या पाचव्या स्थानी राहिले.

Web Title: GLAD jointly third place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.