गोवा एफसीने खाते खोलले!
By admin | Published: November 2, 2014 12:56 AM2014-11-02T00:56:17+5:302014-11-02T00:56:17+5:30
बदली खेळाडू टोल्गो ओज्बेने नोंदविलेल्या 89 व्या मिनिटाच्या गोलामुळे एफसी गोवा संघाला दिल्ली डायनामोसवर निसटता 2-1 गोलांचा विजय मिळविला
Next
मडगाव : बदली खेळाडू टोल्गो ओज्बेने नोंदविलेल्या 89 व्या मिनिटाच्या गोलामुळे एफसी गोवा संघाला दिल्ली डायनामोसवर निसटता 2-1 गोलांचा विजय मिळविला व गोवा संघाची विजयाची प्रतिक्षा संपली़ या सामन्याच्या विजयाने गोवा संघाचे 4 गुण झाल़े
सामन्याच्या पहिल्या सत्रत सुरूवातीलाच काही मिनिटांच्या अंतराने गोवा संघाकडून दोन संधी वाया गेल्या होत्या़ यात दुस:या मिनिटाला गोव्याच्या मिरोस्लाव स्लिपिका याने मारलेला फटका दिल्ली डायनामोस संघाच्या गोलरक्षकाकडे गेला़ त्यानंतर लगेच नारायण दासने मारलेला फटका दिल्लीच्या गोलरक्षकाने अडविला होता़ परत चेंडू मैदानात आला यावेळी रोमियो व मिरोस्लावने चेंडूवर कब्जा मिळविण्यात वेळ घालविली व ही संधी निसटली़
यावेळी संपूर्ण खेळावर वर्चस्व एफसी गोवा संघाचे राहिले असले तरी गोल करण्याचा नेम साधला तो दिल्ली डायनामोस संघाऩे सामन्याचे सातवे मिनिट चालू होत़े दिल्लीचा डेन्मार्कचा खेळाडू मोर्तेन स्कोवुबु याने घेतलेला कॉर्नरचा फटका हन्स मुल्टेरला मिळाला पण त्याने चेंडू स्पेनचा खेळाडू ब्रुनो आरीयसकडे सोपविला तर त्यात गोल करण्याची अधिक संधी असलेल्या मादस जुनकरला पास दिला व त्याने संधीचे परिवर्तन गोलात केले व सामन्याचा पहिला गोल नोंदविण्यात आला़ गोवा एफसीच्या खेळाडूकडून जोरदार आक्रमणो करण्यात आली़ गोल झाल्यानंतर 12 व्या मिनिटाला आंद्रे सांतोसने मिरास्लोवला पास दिला होता पण त्याने मारलेला हेडर चेंडू घेण्याच्या वेळ जुळला नसल्याने त्याची संधी हुकली़ 19 व्या मिनिटाला आणखी एक संधी गोव्याच्या संघाने दवडली़ यावेळी मिरोस्लेव स्लेपिकाने मारलेला फटका मैदानावरून किंचित डाव्या गोलपोस्टजवळून गेला़
गोवा संघाचे आघाडी व मध्य खेळाडू बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न करीत होते तर 32 व्या मिनिटाला गोव्याच्या संघाला आणीख एक संधी प्राप्त झाली़ या सत्रत शेवटची संधी 82 व्या मिनिटाला पोतरुगालच्या ब्रुनो पिनहेरो याने फ्री किकवर दवडली़ दुस:या सत्रच्या पहिल्या 1क् मिनिटांच्या आत गोवा एफसी संघाने तीन संधी वाया घालविल्या़बरोबरी साधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणा:या गोव्याच्या संघाने अखेर संधी साधून 74 व्या मिनिटाला गोल केला़ यावेळी मंदारराव देसाईने चेंडू रोमियो फर्नाडिसकडे दिला तर त्याने वेळ घेऊन मैदानावर नजर मारली व लगेच उडता पास ज्वेल राजाला दिला तर त्याने हेडरवर खुली असलेली बाजू हेरून डाव्या बाजूला गोल केला़ टोल्गे ओब्जेने प्रशिक्षकांचा निर्णय सार्थ ठरवित 89 व्या मिनिटाला संघासाठी विजयी बॅक पास दिला होता तर त्याने चेंडू छातीवर घेऊन गोल मार्क केला व चेंडूला जाळीची दिशा दाखविली़ त्यानंतर सुद्धा आणखी दोन संधी गोव्याच्या संघाने वाया घालविल्या़ मात्र टोल्गेच्या निर्णायक गोलामुळे खचाखच भरलेल्या स्टेडियमवर गोव्याच्या संघाने विजय नोंदविला़
(क्रीडा प्रतिनिधी)
विजय दर्डा गोव्यासाठी लकी
खासदार आणि लोकमत वृत्तपत्र समुहाचे अध्यक्ष विजय दर्डा आजच्या सामन्याच्यावेळी उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण सामन्याचा आनंद घेतला. गोवा संघाच्या पुरस्कत्र्या उद्योगपतींनी दर्डा यांचे वैयक्तिक अभिनंदन केले. गोवा संघ पहिल्यांदा विजयी होत आहे, तुम्ही लकी ठरलात, तुमच्या उपस्थितीमुळे आम्ही जिंकलो, अशा शब्दात त्यांनी विजय दर्डा यांचे अभिनंदन केले.
सुपर लीग चषक फुटबॉल स्पर्धेमुळे सारे विश्व आम्हाला जवळून पाहत आह़े यापुढे सुपरलीग व आयलीग स्पर्धेतून दज्रेदार खेळाडू निर्माण होणार आहेत़ येत्या काही वर्षात भारत 2क् वर्षाखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करीत आह़े गोवा हे फुटबॉलसाठी योग्य ठिकाण आहे, मात्र बेंगळुरूप्रमाणो फुटबॉल पाहण्यासाठी गर्दी दिसत नाही़
- प्रफुल्ल पटेल, अध्यक्ष, अखिल भारतीय फुटबॉल संघ