उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याचे लक्ष्य

By admin | Published: March 10, 2016 03:22 AM2016-03-10T03:22:47+5:302016-03-10T03:22:47+5:30

महिला टी-२० विश्वचषकात सुरुवातीला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे लक्ष्य असल्याचे भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने म्हटले आहे.

Goal to qualify for the semi-finals | उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याचे लक्ष्य

उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याचे लक्ष्य

Next

बंगळुरू : महिला टी-२० विश्वचषकात सुरुवातीला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे लक्ष्य असल्याचे भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने म्हटले आहे.
मिताली राज सराव सामन्याच्या आधी पत्रकारांशी बोलताना म्हणाली, की आमचे लक्ष्य उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे आहे. त्यामुळे साखळी फेरीतील सर्वच सामने आम्ही बाद फेरीतील सामन्यांप्रमाणेच खेळू. मितालीला संघ चांगला खेळ करेल, असा विश्वास आहे. विश्वचषकाच्या आधी आॅस्ट्रेलिया व श्रीलंकेविरोधात झालेल्या मालिकेत संघाने यश मिळवले. ती म्हणाली, की आॅस्ट्रेलिया व श्रीलंकेविरोधात मिळवलेल्या यशाने विश्वचषकासाठी संघाला आत्मविश्वास मिळाला आहे. संघाचा सध्याचा फॉर्म बघता उपांत्य फेरीत नक्कीच प्रवेश करता येईल. आॅस्ट्रेलिया सर्वांत कडवा प्रतिस्पर्धी संघ आहे. मात्र, नुकतेच भारताने या संघालादेखील पराभूत केले आहे.

Web Title: Goal to qualify for the semi-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.