प्रीमियर लीग जिंकणे हेच ध्येय : गिरॉड

By admin | Published: March 4, 2017 12:10 AM2017-03-04T00:10:58+5:302017-03-04T00:10:58+5:30

अर्सेनलच्या आॅलिव्हर गिरॉडला हा सिझन खूप काहीसा निराश करणारा ठरला.

The goal of winning the Premier League is: Girod | प्रीमियर लीग जिंकणे हेच ध्येय : गिरॉड

प्रीमियर लीग जिंकणे हेच ध्येय : गिरॉड

Next


अर्सेनलच्या आॅलिव्हर गिरॉडला हा सिझन खूप काहीसा निराश करणारा ठरला. बहुतांश वेळ तो बेंचवरच होता. त्याच्याऐवजी अलेक्स सांचेंझला संघ व्यवस्थापनाने पसंती दिली होती. तरीही गेल्या काही महिन्यांत गिरॉडने जबरदस्त पुनरागमन केले आहे. गेल्या नऊ सामन्यांत त्याने सहा गोल केले आहेत. अर्सेनलला त्यांच्या फॉर्मची चिंता भेडसावत आहे. बायर्न म्युनिचकडून त्यांना ५-१ असा मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे ते आघाडीच्या चेल्सापेक्षा १३ गुणांनी मागे पडले आहेत. लिव्हरपूल विरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी गिरॉडशी केलेली बातचित.
अर्सेनलच्या अडखळत झालेल्या सुरुवातीनंतर तुला काय वाटते?
आॅलिव्हर : कठोर मेहनत आणि दृढनिश्चयामुळेच मी हे करू शकलो. मी या सिझनच्या सुरुवातीला दुखापतीमुळे काहीसा शाशंक होतो. तसेच मला मैदानावर उतरण्यासही मिळाले नव्हते. मात्र, यावर मात करत मी पुन्हा मैदानावर उतरलो. या सर्व गोष्टींचा वापर मी मैदानावर चांगल्या सुरुवातीसाठी करू इच्छित आहे.
नक्कीच तू हे केले आहेस, या सामन्यात तू गोल करणे कितपत महत्त्वाचे आहे?
आॅलिव्हर : स्ट्रायकरने गोल केलाच पाहिजे. मैदानावर असताना गोल करण्याच्या संधी दवडता कामा नये. मी सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून, तो तसाच सुरु रहावा, यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत.
या सामन्यात तू अंतिम संघात असणार आहेस का?
आॅलिव्हर : मला याचे उत्तर माहीत नाही. याबद्दल संघ व्यवस्थापनच काय ते सांगू शकेल. पण तुम्हाला संघात प्रतिस्पर्धी असले पाहिजेत. मी एक प्रतिस्पर्धी आहे एवढेच सांगू शकेन.
अंतिम संघात निवड होणे किती कठीण असते?
आॅलिव्हर : नक्कीच नाही. आमची संघात मैत्रीपूर्ण स्पर्धा असते. आम्हा सर्वांनाच मैदानाची चांगली माहिती आहे. आमच्या सर्वांचेच ध्येय एकच आहे. संघात निकोप स्पर्धा असणे ही चांगलीच गोष्ट आहे. जर मी गोल करत असेन, तर मी अंतिम ११ मध्ये का नसेल?
संघातील तुझ्या खेळण्याबद्दल शंका असतानाही तू पुन्हा अर्सेनलशीच करार का केलास ?
आॅलिव्हर : मला अर्सेनलबरोबरच रहायचे होते. विशेषत: प्रीमियर लीग जिंकणे हे माझे ध्येय असणार आहे. हा क्लब माझ्यासाठी खास आहे म्हणून मी पुन्हा करार केला आहे.
तुला कोणती ट्रॉफी जिंकण्याची सर्वाधिक इच्छा आहे ?
आॅलिव्हर : ‘प्रीमियर लीग!’ प्रीमियर लीग जिंकणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. त्यानंतर कदाचित मी चीनमध्येही खेळेन. मी सध्या ३० वर्षांचा आहे. प्रीमियर लीग जिंकून आणखी दोन-तीन वर्षे अर्सेनलबरोबर खेळण्याचा विचार आहे. (पीएमजी)

Web Title: The goal of winning the Premier League is: Girod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.