देव जाणो, काय होणार..
By admin | Published: July 12, 2014 01:00 AM2014-07-12T01:00:40+5:302014-07-12T01:00:40+5:30
जेथे विज्ञानाच्या वाटा थांबतात, तेथून ईश्वराची वाट सुरू होते, असं म्हणतात. ब्राझीलमध्ये सध्या मी पदोपदी हे अनुभवतोय. देव जाणो, आमच्या ब्राझीलच्या टीमचं काय होणार? हे सगळ्यांचं ठरलेलं उत्तर.
Next
संदीप चव्हाण
जेथे विज्ञानाच्या वाटा थांबतात, तेथून ईश्वराची वाट सुरू होते, असं म्हणतात. ब्राझीलमध्ये सध्या मी पदोपदी हे अनुभवतोय. देव जाणो, आमच्या ब्राझीलच्या टीमचं काय होणार? हे सगळ्यांचं ठरलेलं उत्तर.
ब्राङिालियन जनता तशी देवभोळी. रिओत तर मला दर किलोमीटरवर एक चर्च सापडतंय. मी रिओतील ज्या सेंट्रो भागात राहतो, तेथे तर अमूक एका चर्चकडून डावीकडे वळा, मग पुढच्या चर्चकडून पुन्हा उजवीकडे वळा समोर एक चर्च दिसेल, असाच पत्ता सांगितला जातो. हे कमी की काय म्हणून जगातील सात आश्चर्यात येथील ‘ािस्त द रिडीमर’ या पुतळ्याचा समावेश नव्यानं करण्यात आलाय. तिस:या क्रमांकाची मॅच उद्या, शनिवारी ब्राझील विरुद्ध नेदरलँड यांच्यात होत असल्यानं जगभरातून रिओत आलेल्या फुटबॉलप्रेमींसाठी तसा आजचा दिवस हा पर्यटनाचा दिवस होता. म्हटलं आपणही ब्राझीलच्या विजयासाठी ख्रिस्ताला साकडं घालू या. तेथे मला साओ पावलोतून आलेला एक कट्टर ब्राङिालियन रिचर्ड भेटला. साओ पावलो हे पेलेचे शहर. ब्राझील संघाला फायनलसाठी चिअरअप करण्याकरिता रिचर्डनं रिओचं प्लॅनिंग आखलं होतं; पण ब्राझील सेमिफायनल हरल्यामुळे त्याने सगळा प्लॅनच बारगळला. आमची टीम कॉफिनमध्ये ऑलरेडी पोहोचलीय. उद्या कॉफिनवर शेवटचा खिळा मारायचा बाकी आहे, असं सांगताना त्याच्या पानावलेल्या कडा मी पाहिल्या.
विचार करा, नेदरलँडनंही ब्राझीलची पुन्ही तीच अवस्था केली, तर काय हाहाकार उडेल. आपल्या येथे टी-2क् वर्ल्डकपमध्ये खराब कामगिरी केल्यावर अगदी धोनीच्या घरावर दगडफेक करण्यार्पयत माथेफिरूंची मजल गेली होती. आपण माथेफिरूच्या बाबतीत अश्मयुगात राहतो, म्हणून दगडफेक; पण हे लॅटिन अमेरिकेचे देश याबाबतीत भलतेच पुढारलेलेत. येथे पहिली लाथ (बहुतांशवेळा ती बंदुकीची गोळीच असते) आणि मग जमलीच तर बात. कोलंबियाचा फुटबॉलपटू आंद्रेस एस्कोबार आठवतोय ना! बिचा:याकडून चुकून स्वयंगोल झाल्यामुळे त्याचा गोळ्या घालून निर्घृण खून केला होता. फुटबॉल हे या लोकांच्या रक्तात वाहतेय आणि त्यासाठी ते प्रसंगी रक्तही वाहायला तयार असतात. फुटबॉल मॅचनंतर होणा:या दंग्यात ब्राझीलमध्ये गेल्या वर्षी 3क् जण मृत्युमुखी पडलेत. ही आकडेवारी भयावह असली तरी रिचर्ड मला ती अभिमानानं सांगत होता. मला तो ही कहाणी सांगत असताना ािस्त द रिडीमर पुतळ्याच्या सभोवती अर्जेटिनाच्या फॅन्सचा घोळका जमा झाला होता. अर्जेटिना म्हणजे ब्राझीलची दुखरी नस. सकाळपासून येथे रिओत पावसानं हजेरी लावल्यामुळे वातावरण ढगाळ होतं आणि म्हणूनच ढगांनी ािस्ताचा अवघा पुतळा झाकून टाकला होता. हाच धागा पकडत रिचर्ड तावातावानं म्हणाला, बघ बघ! अर्जेटिनाच्या चाहत्यांचा जल्लोष पाहावा लागू नये म्हणून आमच्या या ािस्तांनीही आपलं तोंड या ढगात लपवलंय. आम्ही तेवढेही नशीबवान नाही. टीमचे फुटबॉल मैदानावरचे प्रयत्न अपुरे पडताहेत आणि म्हणूनच आता ईश्वराचा धावा सुरू झालाय. खरंच तो देवच जाणो, या ब्राझीलच्या टीमचं काय होणार..