‘गॉडफादर’ धोनी

By admin | Published: July 23, 2014 03:36 AM2014-07-23T03:36:07+5:302014-07-23T03:36:07+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पत्रकार परिषदेसाठी आला तेंव्हा त्याच्या चेह:यावरुन आनंद ओसंडून वाहत होता.

'Godfather' Dhoni | ‘गॉडफादर’ धोनी

‘गॉडफादर’ धोनी

Next
अजय नायडू
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पत्रकार परिषदेसाठी आला तेंव्हा त्याच्या चेह:यावरुन आनंद ओसंडून वाहत होता. त्याला त्याच्या खेळाडूंच्या अंतरंगात डोकावण्याची अंतदृष्टी आहे. एक मात्र खरे की धोनी जे काही करतो ते प्रामाणिक असते. त्याच्याबरोबर क्रिकेटवर चर्चा करणो ही वेगळीच अनुभूती असते
सध्याच्या अननुभवी संघातील काही खेळाडूंसाठी तो मित्र काहींसाठी सल्लागार तर काहींसाठी तो गॉडफादर आहे. इशांत शर्मा, रविंद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांच्यासारख्या खेळाडूंचा तो गॉडफादर आहे. त्यांची पाश्र्वभुमी समजावून घेऊन त्यांना संधी देण्याचे कौशल्य धोनीकडे आहे.
एक नेता म्हणून तो कोणतीही गैर कृती सहन करत नाही नॉटिंगहम कसोटीत अॅँडरसनने केलेल्या कृतीविरुद्ध तक्रार दाखल करताना तो रविंद्र जडेजाच्या पाठीशी  राहिला.
भारतातील विविध राज्यातून येणा:या खेळाडूंची संस्कृती वेगवेगळी असते अशा वेळी सर्व खेळाडूंना एकत्रित ठेवणो त्यांना समजावून घेणो ही गोष्ट  इतकी सोपी नाही. मात्र धोनीला खेळाडूंच्या मानसिकतेची चांगलीच जाण आहे.त्याने लॉर्डसवरील कसोटीत अंतिम दिवशी इशांत शर्माचा ज्या पध्दतीने वापर केला ती अविश्वसनिय गोष्ट होती.
इशांत शर्माला हे समजावून सांगणो कठीण  होते  असे धोनी कबूल करतो. धोनी म्हणाला,‘ दक्षिण आफ्रिका आणि न्यूङिालंड दौ:यात आम्ही दहा षटकांत क्वचित एखादा बॉऊन्सर टाकला होता.’ धोनी म्हणाला, क्रिकेट गुंतागुंतीचा खेळ आहे. इशांतला राऊंड दी विकेट गोलंदाजी करायला आवडत नाही. गेल्या पाच सहा सामन्यांपासून इशांतने बाऊन्सर आणि अन्य छोटय़ा छोटय़ा गोष्टी  करायला सुरुवात केली आहे.
जडेजालाही स्वत:च्या क्षमतेबाबत शंका होती. धोनीने त्याला त्याच्या मानसिकतेत बदल करायला सांगितला.  फक्त तंत्र असण्यापेक्षा चांगला स्वभाव व भक्कम मन असणो या गोष्टीला धोनी महत्व देतो. तो म्हणतो, मी तंत्रची कधीच चर्चा करत नाही. मात्र तुमचा दृष्टीकोन महत्वाचा आहे.मी त्यांना एका चांगल्या स्थितीत नेले आहे जेथे त्यांना आरामदायक वाटेल. त्यांना कर्णधार म्हणून माझा पाठींबा नेहमीच असतो आणि त्याचे फायदे तुम्हाला मैदानात दिसतात.
धोनीची ही पद्धत खेळाडू आणि कर्णधार म्हणून बरोबर नसेलही मात्र क्रिकेट हा पुस्तकी खेळ नाही.या प्रत्येक वेळी नाविण्यपूर्ण गोष्टी घडतात.
‘लॉर्डसवरील विजय हा माङयासाठी आनंददायी गोष्ट आहे. प्रामाणिकपणो सांगायचे झाले तर कदाचित ही येथील माझी शेवटची कसोटी असेल. कारण मी पुन्हा येथे येईन असे मला वाटत नाही.’
 
भारतीय संघाचे ‘सेलिब्रेशन’
इंग्लंडविरुद्ध मंगळवारी लॉर्ड्सवर भारतीय संघाने ऐतिहासिक विजय नोंदवला अन् सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले. येथील भारतीय चाहते जाम खूश आहेत. ‘ताज हॉटेल’ जेथे संघ राहात आहे. त्या परिसरातील सेंट जेम्स कोर्टवर चाहत्यांनी गर्दी करीत आनंदोत्सव साजरा केला. भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ‘कूल स्माईल’ देत चाहत्यांना अभिवादन केले. 
या विजयानंतर भारतीय संघाने परंपरेनुसार ‘टीम डिनर’चा आनंद लुटला. विशेष म्हणजे, विजयानंतर लगेचच खेळाडूंना दोन दिवसांची सुटी जाहीर करण्यात आली. त्यामुळे इंग्लंड वारीत आता खेळाडू आपल्या मित्रंना भेटतील, काही शॉपिंग करतील, तर काही जण हॉटेलमध्ये विश्रंती घेतील. 
दुसरीकडे, इंग्लंडसंघ मात्र आपल्या कामगिरीचे ‘पोस्टमार्टम’ करतील. मालिकेत अजून तीन कसोटी सामने शिल्लक आहेत. त्यामुळे अतिउत्साहित न होता भारतालाही कामगिरीकडे लक्ष द्यावे लागेल. 
 
मला जी जबाबदारी दिली होती ती निभावल्याबद्दल मी समाधानी आहे.- धोनी
 

 

Web Title: 'Godfather' Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.