टी स्टॉल चालवून मॅरेथॉनध्ये सुवर्ण पदकांची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 05:57 AM2018-04-08T05:57:20+5:302018-04-08T05:57:20+5:30

तीन मुलांची आई असलेली ४५ वर्षांची महिला टी स्टॉल चालवते आणि मॅरेथॉनमध्येही धावते. तिने आतापर्यंत सुवर्णपदकांसह अनेक पदके पटकावली असल्याचे सांगितले तर खरे वाटणार नाही. परंतु तामिळनाडूतील पुडुकोट्टईमध्ये राहणाऱ्या महिलेने हे करुन दाखवले आहे.

 Gold medal earnings at the Marathon by running the Tea Stall | टी स्टॉल चालवून मॅरेथॉनध्ये सुवर्ण पदकांची कमाई

टी स्टॉल चालवून मॅरेथॉनध्ये सुवर्ण पदकांची कमाई

googlenewsNext

चेन्नई : तीन मुलांची आई असलेली ४५ वर्षांची महिला टी स्टॉल चालवते आणि मॅरेथॉनमध्येही धावते. तिने आतापर्यंत सुवर्णपदकांसह अनेक पदके पटकावली असल्याचे सांगितले तर खरे वाटणार नाही. परंतु तामिळनाडूतील पुडुकोट्टईमध्ये राहणाऱ्या महिलेने हे करुन दाखवले आहे. गेल्रा महिन्यात अन्नूरला झालेल्या मॅरेथॉनमध्ये कलाईमणी यांनी सुवर्णपदक पटकावले. त्यांची जिद्द कायम असून आहे.
कलाईमणी यांचे शिक्षण दहावीपर्यंत. शाळेत असताना त्या कबड्डी व अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांत भाग घेत असत. टी स्टॉल चालवणाºया पी. अळगू यांच्याशी त्यांचा विसाव्या वर्षी विवाह झाला. आपण अ‍ॅथेलेटिक्समध्ये भाग घेतच राहणार, असल्याचे त्यांनी पतीला सांगितले आणि त्यांनीही मान्यता दिली.
पतीसह त्या चहाचा स्टॉल चालवतात. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे.
त्यांनी ‘फिनिक्स रनर्स’ ग्रुपद्वारे अनेकदा २१ किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धांमध्ये भाग घेऊ न, चार सुवर्णपदके पटकावली. (वृत्तसंस्था)

- मी रोज पहाटे चार वाजता उठून नाश्ता तयार केल्यानंतर नवºयाला स्टॉलवर सोडते. त्यानंतर माझा सराव सुरु होतो. दर रविवारी आम्ही सारे २१ किलोमीटर धावतो. आता ४१ किलोमीटरसाठी विशेष सराव आहे, असे त्या सांगतात.
लग्नानंतर अनेक जणी कुटुंब आणि मुलाबाळांसाठी स्पर्धांमध्ये भाग घेणे बंद करतात. ते योग्य नाही. मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सर्व वयोगटासाठी संधी असतात, हे लक्षात ठेवले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे.

चार तासांत ४१ किमी
डिसेंबरमध्ये करुरच्या पुगलुरमध्ये राज्य अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेत त्यांनी तीन सुवर्णपदके पटकावली. कोईम्बतूरच्या (२०१४) नॅशनल मास्टर्समध्येही (८०० मीटर) सुवर्णपदक मिळवले आणि १५०० मीटरमध्ये तिसरा क्रमांक मिळवला. घरगुती समस्यांमुळे फेब्रुवारी २०१८ मध्ये बंगळुरुच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्या सहभागी नव्हत्या.पुढच्या खेपेस मात्र सुवर्णपदकाचा संकल्प आहे. त्यांना ४१ किलोमीटरचे अंतर त्यांना चार तासांत पूर्ण करावयाचे आहे.

Web Title:  Gold medal earnings at the Marathon by running the Tea Stall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा