CWG 2022: भारताची 'गोल्डन हॅटट्रिक'! दीपक पुनियाने पाकिस्तानी कुस्तीपटूला नमवून मिळवलं सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 11:55 PM2022-08-05T23:55:42+5:302022-08-05T23:56:24+5:30
पाकिस्तानच्या मुहम्मद इनामला ३-० ने केलं पराभूत
Commonwealth Games 2022 Deepak Punia wins Gold Medal: भारतीय कुस्तीपटू दीपक पुनिया याने भारताला यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील नववे सुवर्णपदक मिळवून दिले. बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक या दोघांच्या विजेतेपदानंतर दीपक पुनियाच्या मॅचकडेच साऱ्यांचे लक्ष होते. दीपक पुनियाने अपेक्षेप्रमाणे प्रतिस्पर्ध्याला पाणी पाजले आणि सुवर्णपदाकवर नाव कोरले. दीपक पुनियाने ८६ किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मुहम्मद इनाम याला ३-० असं पराभूत केले. आजच्या दिवसात हे कुस्तीमध्ये भारताला मिळालेले तिसरे सुवर्णपदक ठरले.
DEEPAK HAS DONE IT 🔥🔥
— SAI Media (@Media_SAI) August 5, 2022
3️⃣rd Back To Back GOLD 🥇for 🇮🇳
Unassailable @deepakpunia86 🤼♂️ (M-86kg) wins GOLD on his debut at #CommonwealthGames 🔥🔥
The World C'ships 🥈 medalist displayed brilliant form at @birminghamcg22 with 2 technical superiority wins 😁#Cheer4India
1/1 pic.twitter.com/5hEJf6Ldd4
बजरंग पुनिया, साक्षी मलिकलाही सुवर्णपदक!
भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik) हिने ६२ किलो वजनी गटात कॅनडाच्या गोडीनेज गोन्झालेझ हिला पराभूत करत गोल्ड मेडल मिळवलं. साक्षी पहिल्या फेरीत ०-४ अशी पिछाडीवर होती पण दुसऱ्या फेरीत साक्षीने प्रतिस्पर्धी खेळाडूला चांगलाच दम दाखवला. तिने गोडीनेज गोन्झालेझला चितपट करून तिची पाठ टेकवली आणि ४-४ अशा बरोबरीसह सुवर्ण पदकावर नाव कोरलं. साक्षीने प्रतिस्पर्ध्याला चितपट केल्याने (by Fall) तिला विजेती जाहीर करण्यात आलं. त्याआधी बजरंग पुनिया (Bajrang Punia) याने भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं. कुस्तीच्या ६५ किलो वजनी गटात बजरंग पुनियाने कॅनडाच्या लाचलन मॅकनील याचा ९-२ असा अतिशय सहज आणि एकतर्फी पराभव केला.
अंशू मलिकला रौप्यपदकावर मानावं लागलं समाधान!
सुरूवातीला भारताची महिला कुस्तीपटू अंशू मलिक (Anshu Malik) हिने ५७ किलो फ्री स्टाइल प्रकाराच्या अंतिम फेरीत रौप्यपदकाची कमाई केली. नायजेरियाच्या ओडुनायो अडेकुरोये हिच्याकडून अंशूला ७-३ ने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे अंशूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंशू मलिकने उपांत्य फेरीत श्रीलंकेच्या नेथमी पोरुथोत्झचा आणि उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या इरेन सिम्नेडीसचा १०-० असा पराभव केला होता. पण फायनलमध्ये तिने रौप्यपदक जिंकलं.