महाराष्ट्राच्या श्रद्धा घुलेने पटकावले सुवर्णपदक
By admin | Published: September 17, 2015 12:26 AM2015-09-17T00:26:22+5:302015-09-17T00:26:22+5:30
राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रद्धा घुले हिने लांब उडीत ‘सुवर्ण’झेप घेतली. मयुका जॉनी, अॅमे प्रजुशा, निना व्ही. या केरळाच्या अव्वल खेळाडूंना मागे टाकत तिने
कोलकाता : राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रद्धा घुले हिने लांब उडीत ‘सुवर्ण’झेप घेतली. मयुका जॉनी, अॅमे प्रजुशा, निना व्ही. या केरळाच्या अव्वल खेळाडूंना मागे टाकत तिने ही कामगिरी करून स्पर्धेत खळबळ माजवली. कोलकाता येथील साई ईस्ट स्टेडियमवर बुधवारपासून ५५व्या राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेस सुरुवात झाली.
महाराष्ट्राची श्रद्धा गोळे ही ओएनजीसीचे प्रतिनिधित्व करीत आहे. तिने यावेळी ६ पैकी ४ वेळा ६.३४ मीटरची उडी घेत सुवर्णपदकावर कब्जा केला. इतर खेळाडूंना तिच्या जवळपासही पोचता आले नाही.
विशेष म्हणजे तिने यावेळी अव्वल राष्ट्रीय खेळाडूंना प्रथमच पराभूत करण्याची कामगिरी तिने केली. तसेच श्रद्धाने ६.३८ मीटरची वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले. मूळची केरळची असलेली ओएनजीसीची मयुखा जॉनीने (६.३४ मीटर) रौप्य, तर रेल्वेची तनजिला खातूनने कांस्य पदक संपादन केले. श्रद्धाने या पूर्वी सीनिअर फेडरेशन व आंतरराज्य अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्य पटकावले होते. ती प्रशिक्षक नीलेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.