सुवर्णांची लयलूट सुरूच
By admin | Published: February 11, 2016 03:31 AM2016-02-11T03:31:01+5:302016-02-11T03:31:01+5:30
भारताने १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या दिवशीही सुवर्णांची लयलूट सुरूच ठेवली. त्यात नेमबाज, वुशू, तसेच ट्रॅक अॅन्ड फिल्ड प्रकाराचे मोलाचे योगदान राहिले. भारताने ११७
गुवाहाटी : भारताने १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या दिवशीही सुवर्णांची लयलूट सुरूच ठेवली. त्यात नेमबाज, वुशू, तसेच ट्रॅक अॅन्ड फिल्ड प्रकाराचे मोलाचे योगदान राहिले. भारताने ११७ सुवर्ण, ६१ रौप्य आणि १६ कांस्यांसह आतापर्यंत १९४ पदकांची कमाई केली आहे. पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या लंकेने २४ सुवर्ण, ४६ रौप्य आणि ६३ कांस्यपदकांसह १३३ पदके जिंकली. अॅथलेटिक्सनी आज भारताच्या झोळीत आणखी सात सुवर्णांची भर घातली. पुरुष भालाफेकीत नीरज चोपडा, ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत आरोक्या राजीव, हातोडा फेकीत अर्जुन, ११० मीटर अडथळा शर्यतीत जे. सुरेंदर, महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत गायत्री, पुरुषांच्या लांब उडीत अंकित शर्मा यांनी सुवर्णमय कामगिरी केली. त्याआधी जलतरणात भारताने अखेरच्या दिवशी पाच सुवर्णपदके जिंकली. वुशू स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताने ८ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्यपदके पटकविली.
खो-खोसाठी सोनियाचा दिनू़.़.़
खो-खोमध्ये महिला गटाच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेश संघाचा (१६-८,०-६) १६-१४ असा १ डाव व २ गुणांनी पराभव करून सुवर्णपदक जिंकले. सारिका काळेने १.४० मि संरक्षण तर शीतल भोरने ६ गडी बाद केले़ पुरुष गटात प्रतीक वाईकर (२.३०मि़ व २ गडी) व रंजन शेट्टीच्या (१.३० मि़ व २ गडी) उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारतीय संघाने बांगलादेश संघाला (१५-७,२२-७) ३७-१४ असा २३ गुणांनी फडशा पाडीत विजेतेपद जिंकले.
रिकर्व्ह तिरंदाजी: भारताला पाच सुवर्ण
शिलाँग : भारतीय तिरंदाजांनी बुधवारी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या वैयक्तिक रिकर्व्ह महिला, रिकर्व्ह पुरुष आणि मिश्र गटात पाच सुवर्णपदके जिंकली. महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात दीपिकाने फायनलमध्ये सहकारी बोंबाल्यादेवीचा पराभव करीत सुवर्ण जिंकले. बोंबाल्याला रौप्य आणि भूतानच्या खेळाडूला कांस्य मिळाले. पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात तरुणदीप रॉयने सहकारी गुरुचरण बसरा याला नमविले. या प्रकारातील कांस्य नेपाळच्या खेळाडूला मिळाले. महिला रिकर्व्ह सांघिक प्रकारात दीपिका, बोंबाल्या आणि लक्ष्मीराणी मांझी यांनी लंकेवर ६-० ने मात करीत सुवर्ण जिंकले. लंकेच्या संघाला रौप्य व भूतानला कांस्यावर समाधान मानावे लागले. तरुणदीप, गुरुचरण आणि जयंत तालुकदार यांच्या रिकर्व्ह संघाने लंकेला ५-१ ने नमवीत सुवर्ण जिंकून दिले. सांघिक मिश्र रिकर्व्ह प्रकारात दीपिका-तरुणदीप यांनी बांगलादेशवर ६-० ने विजय नोंदवीत सुवर्ण मिळवून दिले.
टेनिस :
तीन सुवर्णांची कमाई
भारतीय टेनिसपटूंनी वर्चस्व कायम राखून चौथ्या दिवशी तिन्ही सुवर्णपदके जिंकली. आजच्या सर्वच फायनल्स भारतीय खेळाडूंदरम्यान खेळल्या गेल्या. पुरुष दुहेरीत रामकुमार रामनाथन-विजय प्रशांत यांनी दिविज-सनमसिंग यांचा ६-३, ६-४ ने पराभव केला. महिला एकेरीत अंकिता राणा हिने प्रेरणा भांबरीवर ६-१, ६-० ने विजय नोंदविला. अंकिता-दिविज यांनी मिश्र दुहेरीत सनमसिंग-प्रार्थना ठोंबरे यांचा ६-२, ७-२ ने पराभव केला.
जलतरण :
वीरधवलला सुवर्ण
भारतीय जलतरणपटूंनी अखेरच्या दिवशी आणखी पाच सुवर्णपदके जिंकली. याशिवाय तीन रौप्य आणि एक कांस्यदेखील मिळाले. वीरधवल खाडे ५० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्णाचा मानकरी ठरला. श्रद्धा सुधीरने महिलांच्या २०० मीटर मेडलेमध्ये सुवर्ण, ज्योत्स्ना पानसरे हिने महिलांच्या ५० मीटरफ्लाय प्रकारात सुवर्ण जिंकले. याशिवाय पुरुष व महिला संघाने ४ बाय १०० मिडले प्रकाराचे सुवर्ण जिंकले.
जलतरण :
वीरधवलला सुवर्ण
भारतीय जलतरणपटूंनी अखेरच्या दिवशी आणखी पाच सुवर्णपदके जिंकली. याशिवाय तीन रौप्य आणि एक कांस्यदेखील मिळाले. वीरधवल खाडे ५० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्णाचा मानकरी ठरला. श्रद्धा सुधीरने महिलांच्या २०० मीटर मेडलेमध्ये सुवर्ण, ज्योत्स्ना पानसरे हिने महिलांच्या ५० मीटरफ्लाय प्रकारात सुवर्ण जिंकले. याशिवाय पुरुष व महिला संघाने ४ बाय १०० मिडले प्रकाराचे सुवर्ण जिंकले.
तीन सुवर्णांसह सहा पदके
रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेली अपूर्वी चंदेला
हिच्या नेतृत्वाखालील भारतीय तिरंदाजी संघाने
स्पर्धेच्या सुरुवातीला तीन सुवर्णांसह सहा पदके जिंकली. चंदेलाने आपल्या आवडत्या १० मीटर एअर रायफलचे सुवर्ण जिंकले. एलिझाबेथ सुझान आणि पूजा घाटकर यांना रौप्य, तसेच कांस्यावर समाधान मानावे लागले. पुरुष गटात ५० मीटर पिस्तूल प्रकारात एकही भारतीय नेमबाज पदक जिंकू शकला नाही. ओम प्रकाशला रौप्य मिळाले. प्रकाशच्या डाव्या डोळ्याला इजा झाली आहे. भारतीय संघाने पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल आणि महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सांघिक सुवर्ण जिंकले.
टेबल टेनिस :
मनिकाची सुवर्णांची हॅट्ट्रिक
गत महिला राष्ट्रीय चॅम्पियन मनिका बत्रा
हिने सुवर्णांची हॅट्ट्रिक साधली. या प्रकारात बुधवारी भारताने दोन सुवर्ण आणि दोन रौप्यपदके जिंकली. दिल्लीची खेळाडू असलेल्या मनिकाने पूजा सहस्रबुद्धेसोबत मौमा दास- के. शामिनी या सहकारी जोडीचा ३० मिनिटांत ११-७, १३-११, ११-५ ने पराभव करीत तिसरे सुवर्ण जिंकले. याआधी तिने सांघिक तसेच मिश्र दुहेरीचे सुवर्ण जिंकले आहे. पुरुष दुहेरीत जी. साथियान- देवेश कारिया जोडीने अॅन्थोनी अंमलराज-सानिल शेट्टी यांना ११-१, ११-८, ११-६ ने नमविले.