वीरधवल खाडेला सुवर्ण, सिंगापूर राष्ट्रीय वयोगट जलतरण स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:17 AM2018-03-20T01:17:18+5:302018-03-20T01:17:18+5:30
भारताचा अव्वल जलतरणपटू वीरधवल खाडेने आपल्या उत्कृष्ट कामगिरीत सातत्य राखत ४९व्या सिंगापूर राष्ट्रीय वयोगट जलतरण स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात २३.०२ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले.
सिंगापूर : भारताचा अव्वल जलतरणपटू वीरधवल खाडेने आपल्या उत्कृष्ट कामगिरीत सातत्य राखत ४९व्या सिंगापूर राष्टÑीय वयोगट जलतरण स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात २३.०२ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले.
या सुवर्णकामगिरीनंतर वीरधवल म्हणाला, ‘देशासाठी खेळत असताना पदक जिंकले की नेहमीच खूप समाधान मिळते. खरे म्हणजे यापेक्षा चांगली वेळ नोंदवेन असे मला वाटत होते, त्या दृष्टीने मी तयारीसुद्धा केली होती. पण चांगली वेळ नोंदविण्यात अपयश आले. सिंगापूरमध्ये सर्व शर्यती चुरशीच्या झाल्या. यामध्ये मला खूप काही शिकायला मिळाले. आगामी काळात चांगली कामगिरी नक्कीच करेन.’
मुळचा कोल्हापूरचा असलेल्या वीरधवल खाडेने सध्या आपले संपूर्ण लक्ष पुढील महिन्यात आॅस्टेÑलियामध्ये होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीकडे केंद्रीत केले आहे. याविषयी त्याने म्हटले की, ‘मी पाच महिन्यांपासून बंगळुरुमध्ये सराव करीत आहे. सर्व काही व्यवस्थित सुरु असून माझ्याकडे खूप वेळ आहे आणि माझ्या कामगिरीत सुधारणा होत आहे.’ (वृत्तसंस्था)