सुपर सायनामुळे सोनेरी दिवस!

By Admin | Published: September 9, 2015 02:25 AM2015-09-09T02:25:39+5:302015-09-09T02:25:39+5:30

बॅडमिंटन खेळाला नवचैतन्य मिळवून देणाऱ्या भारताच्या सायना नेहवालवर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाचे (बीडब्ल्यूएफ) महासचिव थॉमस लुंडही फिदा आहेत.

Golden Day for Super Saina! | सुपर सायनामुळे सोनेरी दिवस!

सुपर सायनामुळे सोनेरी दिवस!

googlenewsNext

क्वालालंपूर : बॅडमिंटन खेळाला नवचैतन्य मिळवून देणाऱ्या भारताच्या सायना नेहवालवर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाचे (बीडब्ल्यूएफ) महासचिव थॉमस लुंडही फिदा आहेत. त्यांच्या मते, सायनाच्या सातत्यपूर्ण यशामुळे या खेळाला विश्व स्तरावर सोनेरी दिवस येत आहेत. सायनाने नुकताच लाखो डॉलरचा करार केला. या करारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाला अधिक व्यावसायिक स्वरूप येईल, असे संकेतही लुंड यांनी दिले आहेत.
ते म्हणाले, तिच्या यशामुळे या खेळाला ग्लॅमर प्राप्त झाले आहे. आता सायनाने आयओएस अ‍ॅण्ड एंटरटेनमेंटसोबत दोन वर्षांचा करार केला असून यातून तिची जवळपास ३७ लाख डॉलरची कमाई होणार आहे. या करारामुळे मोठे संकेत मिळत आहे. कोर्टवर चांगल्या प्रदर्शनामुळे आपण आर्थिकदृट्या संपन्नही होऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.

Web Title: Golden Day for Super Saina!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.