भारतीय हॉकीची ‘गोल्डन गर्ल’; माजी हॉकी कर्णधार ममता खरब हिचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 05:46 AM2021-01-26T05:46:52+5:302021-01-26T05:47:09+5:30

वुमेन्स चॅम्पियन्स चॅलेंज स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या भारतीय संघात सहभाग.

The ‘Golden Girl’ of Indian hockey; Former hockey captain Mamata Kharab's birthday | भारतीय हॉकीची ‘गोल्डन गर्ल’; माजी हॉकी कर्णधार ममता खरब हिचा वाढदिवस

भारतीय हॉकीची ‘गोल्डन गर्ल’; माजी हॉकी कर्णधार ममता खरब हिचा वाढदिवस

googlenewsNext

ममताचा जन्म २६ जानेवारी १९८२ रोजी रोहतक (हरयाणा) येथे झाला.

लक्षवेधी कामगिरी 

२००२ राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध निर्णायक विजयी गोल करत भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यात मोलाचे योगदान. तब्बल ३२ वर्षांनी भारतीय महिलांनी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पटकावण्याची कामगिरी केली.

  • २००० साली ज्युनिअर आशिया चषक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम स्कोअररचा पुरस्कार पटकावला. भारताच्या कांस्य पदक विजयात मोलाची कामगिरी.
  • २००२ साली जोहान्सबर्ग येथे झालेल्या वुमेन्स चॅम्पियन्स चॅलेंज स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या भारतीय संघात सहभाग.
  • २००४ साली नवी दिल्ली येथे झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताला जेतेपद मिळवून देण्यात निर्णायक खेळ.
  • २००५ साली चार देशांच्या स्पर्धेतील रौप्य पदक विजेत्या भारतीय संघात समावेश. त्याचवर्षी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय गोल्ड कप स्पर्धेत रौप्य पदक विजेत्या भारतीय संघात समावेश.

Web Title: The ‘Golden Girl’ of Indian hockey; Former hockey captain Mamata Kharab's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी