पॅराजम्पर शीतलाला इजिप्तमध्ये सुवर्ण प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 03:38 AM2018-10-27T03:38:44+5:302018-10-27T03:38:46+5:30

पॅराजम्पिंग या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध रेकॉर्ड बनवून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या पद्मश्री शीतल महाजन हिला फेडरेशन आॅफ एरोनॉटिकल इंटरनॅशनलच्या (एफएआय) वतीने इजिप्त येथे उल्लेखनीय कामगिरीसाठी सुवर्ण पदक प्रदान करुन गुरुवारी सन्मानित केले.

Golden gold in Parajumpter Shitalla | पॅराजम्पर शीतलाला इजिप्तमध्ये सुवर्ण प्रदान

पॅराजम्पर शीतलाला इजिप्तमध्ये सुवर्ण प्रदान

Next

मुंबई : पॅराजम्पिंग या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध रेकॉर्ड बनवून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या पद्मश्री शीतल महाजन हिला फेडरेशन आॅफ एरोनॉटिकल इंटरनॅशनलच्या (एफएआय) वतीने इजिप्त येथे उल्लेखनीय कामगिरीसाठी सुवर्ण पदक प्रदान करुन गुरुवारी सन्मानित केले.
‘एफएआय’ ही संस्था जागतिक स्तरावर आकाशातील सर्व खेळांचे नियमन करणारी सर्वोच्च संस्था आहे. शीतलने यंदा एकाच वर्षात सहा खंडांंमध्ये स्काय डाइव्ह करण्याचा पराक्रम केला. या साहसी कामगिरीसाठी शीतलला ‘सबिहा गोकसन सुवर्ण पदक’ प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार पटकावणारी शीतल पहिली भारतीय महिला ठरली. तसेच एका वर्षात जगातील सहा खंडात स्काय डायविंग करणारी ती प्रथम महिला असून हा तिचा एकूण सहावा जागतिक विक्रम आहे.
यापूर्वी भारतातील जे.डी.आर टाटा (१९८४) यांना द एफएआय गोल्ड एअर मेडल, एफएआय कांस्य पदक अतुल देव (१९९६), द पॉल तिसदीर डिप्लोमा पुरस्कार विश्वबंधु गुप्ता (१९८५), कॅप्टन सतीश शर्मा (१९८५), एफ. एच. इराणी (१९५८), आर. के. वासन (१९८९), द एफएआय एअर स्पोर्ट मेडल पुरस्कार अतुल देव (१९९४) व दी मंगोलफिर बल्लूनिंग डिप्लोमा पुरस्कार विजयपत सिंघनिया (२००६) या आठ भारतीयांना एफएआयने गौरविले आहे.
>एफएआय संस्था वर्ल्ड ऐरो-स्पोर्ट्स चॅम्पियनशिप आणि जागतिक स्कायडायविंग स्पर्धांचे आयोजन करते. तसेच, पराग्लायडिंग आणि हॉट एअर बलूनसह एकूण १४ ऐरो क्रीडाप्रकारांचे आयोजनही करते.
>मी हा पुरस्कार स्विकारण्यासाठी अमेरिकेतून आली. कारण तेथे मी एक स्पर्धेसाठी गेली होती. पण येथे येण्यासाठी मला आर्थिक चणचण भासली. अमेरिकेतील स्पर्धेसाठी माझ्या पालकांनी ४ लाख रुपयांचे कर्ज काढले. मला या खेळासाठी सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. या साहसी खेळाकडे सरकारने लक्ष द्यावे हीच माझी अपेक्षा आहे.
- शीतल महाजन

Web Title: Golden gold in Parajumpter Shitalla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.