‘सुवर्ण’ पाऊस कायम

By Admin | Published: February 13, 2016 01:31 AM2016-02-13T01:31:16+5:302016-02-13T01:31:16+5:30

१२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदकांचा पाऊस पाडताना लांब पल्ल्याची धावपटू कविता राऊतने रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली.

The 'golden' rain continues | ‘सुवर्ण’ पाऊस कायम

‘सुवर्ण’ पाऊस कायम

googlenewsNext

गुवाहाटी : १२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदकांचा पाऊस पाडताना लांब पल्ल्याची धावपटू कविता राऊतने रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. भारताने पदक तालिकेतील अव्वल स्थान मजबूत केले आहे. भारताने या स्पर्धेत १४६ सुवर्ण, ७९ रौप्य आणि २३ कांस्यपदकांसह एकूण २४८ पदकांची कमाई केली. दुसऱ्या स्थानावरील श्रीलंका भारताच्या तुलनेत बरीच पिछाडीवर आहे. श्रीलंकेने १५७ पदकांची कमाई केली आहे. त्यात २५ सुवर्ण, ५३ रौप्य आणि ७९ कांस्यपदकांचा समावेश आहे. पाकिस्तानाने ७ सुवर्ण, २३ रौप्य व ४३ कांस्यपदकांसह एकूण ७३ पदकांची कमाई करीत तिसरे स्थान पटकावले आहे.
अ‍ॅथलेटिक्समध्ये शुक्रवारी अखेरच्या दिवशी कविताने २ तास ३९ मिनिटे आणि ३८ सेंकद वेळेसह या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेली
ती चौथी भारतीय धावपटू ठरली. ओपी जैशा, ललिता बाबर व सुधा सिंग यांनी यापूर्वीच रिओ आॅलिम्पिक तिकीट पक्के केले आहे. आॅलिम्पिक मॅरेथॉनची पात्रता वेळ २ तास ४२ मिनिटांची होती. श्रीलंकेच्या एन.जी. राजशेखराने रौप्य तर बी. अनुराधीने कांस्यपदक पटकावले. नाशिकची कविता सॅग स्पर्धेच्या माध्यमातून आॅलिम्पिक पात्रता मिळवणारी एकमेव धावपटू आहे.
पुरुषांच्या स्पर्धेत फिनिशिंगबाबत संभ्रम होता. तांत्रिक समितीच्या
एका सदस्याने सांगितले की, ‘रावत व कुरे यांना फिनिशिंग लाइनबाबत पुरेशी माहिती नव्हती. स्टेडियममध्ये एक लॅपनंतर शर्यत संपणार असल्याची त्यांची समज होती. त्यामुळे सुवर्ण व रौप्यपदक विजेत्या खेळाडूंच्या टायमिंगमध्ये एका सेकंदाचा फरक होता. कुरे रौप्य तर खेता राम कांस्यपदकाचा मानकरी ठरला. रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारे अन्य खेळाडू नितेंद्र सिंग रावतने पुरुष मॅरेथॉनमध्ये २ तास १३ मिनिटे १८ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले. त्याने श्रीलंकेच्या कुरे अनुराधा इंद्रजीतला एक सेकंद वेळेने पिछाडीवर सोडले.
गतविजेत्या बलाढ्य भारताने पुरुष गटात विजयी सुरुवात करताना कबड्डीचीत भक्कम आगेकूच केली. सलामीला अफगाणिस्तान संघ अनुपस्थित राहिल्यानंतर भारताला विजयी घोषित करण्यात आले. भारताच्या महिलांनीही सलग दुसरा विजय मिळवला. पुरुषांनी नेपाळला ४८ - २३ असे लोळवले.मध्यांतराला भारताने १९-१२ अशी आघाडी घेतल्यानंतर आपला हिसका दाखवत नेपाळला कबड्डीचे धडे दिले. तर यानंतर भारताने श्रीलंकेचे आव्हान ३५ - २१ असे परतावून दुसरा विजय नोंदवला.
दोन्ही सामन्यांत राहुल चौधरीने निर्णायक
अष्टपैलू खेळ केला. तर काशिलिंग आडके व
कर्णधार अनुप कुमार यांनी आक्रमक व खोलवर चढाया करताना राहुलला चांगली साथ दिली. भारताच्या महिलांनी दुसरा विजय मिळवताना श्रीलंकेचा ३७-१३ असा फडशा पाडला. मध्यांतराला १८-७ अशी एकतर्फी आघाडी घेतली होती. (वृत्तसंस्था)

चैनचा सुवर्णवेध, नारंगला कांस्य
नेमबाजीमध्ये चैन सिंगने वैयक्तिक दुसरे सुवर्णपदक पटकावताना भारताचा बलाढ्य गगन नारंगला मागे टाकण्याची किमया केली. भारताने शुक्रवारी चारही सुवर्णपदके पटकावली. २६वर्षीय चैन सिंगने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये त्याचा सिनिअर सहकारी गगन नारंगला पिछाडीवर सोडताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. कालिपारा शूटिंग रेंजमध्ये गुरुवारी ५० मीटर रायफल प्रोनमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या चैनने २०४.६ असा स्कोअर नोंदवला.

गगनने २०१२च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये या प्रकारात कांस्यपदक पटकावले होते. येथेही त्याला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. ५० मीटर प्रोनमध्येही त्याला चैनकडून पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशच्या मोहम्मद सोवोन चौधरीने २०३.६ गुणांसह रौप्यपदक पटकावले. चैन, नारंग व इम्रान खान या भारतीय त्रिमूर्तीने १० मीटर एअर रायफल स्पर्धेत १८६३.४चा स्कोअर नोंदवताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. बांगालदेशने रौप्य तर श्रीलंकेने कांस्यपदक पटकावले.

Web Title: The 'golden' rain continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.