छप्परफाड कमाई, 60 लाखांची बेट लावली अन् जिंकले 8 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 11:08 AM2019-04-17T11:08:55+5:302019-04-17T11:13:40+5:30
हा खेळाडू बाजी मारेल असे कोणालाही वाटले नव्हते...
वॉशिंग्टन : इंडियन प्रीमिअर लीगचा ज्वर चांगलाच चढला आहे. वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून आवडत्या खेळाडूची निवड करून मालामाल होण्याची संधीही आता विविध प्लॅटफॉर्ममधून क्रिकेट चाहत्यांना उपलब्ध झाली आहे. भारतात हे व्यासपीठ गेल्या काही वर्षभरापासून सुरू झाले असले तरी परदेशात फार आधीपासून असे अॅप आहेत आणि तेथे बेटिंग हे अधिकृतही आहे. अशाच एका बेटिंगमध्ये एका चाहत्याने छप्परफाड कमाई केली आहे. वॉशिंग्टनमधील जेम्स अॅड्युचीने 60 लाखांची बेटिंग लावली होती आणि त्यात त्याने तब्बल 8,28,86,475 रुपयांची ( 1.2 मिलियन डॉलर) कमाई केली.
5 green jackets.
— Trump Golf (@TrumpGolf) April 14, 2019
15 major championships.
Greatest comeback in sports history.
Congratulations to our dear friend @TigerWoods on his spectacular #Masters VICTORY! #TheMasterspic.twitter.com/kRt4ibM5Q4
णाच्या ध्यानी मनी नसताना दिग्गज गोल्फपटू टायगर वूड्सने मास्टर्स स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. तब्बल 14 वर्षांनी त्याने या स्पर्धेवर नाव कोरून इतिहास घडवला. गेली अनेक वर्ष टायगर वूड्स वैयक्तिक कारणामुळे आणि दुखापतीमुळे मैदानाबाहेर होता. त्यामुळे 39 वर्षीय टायगर मास्टर्स स्पर्धेत युवा व प्रतिभावान खेळाडूंसमोर टिकणार नाही, याची सर्वांना खात्री होती. पण, टायगरने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत पाचव्यांदा मास्टर्स स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.
Tiger Woods.. Major Championships (15).
— Mohandas Menon (@mohanstatsman) April 14, 2019
- The #Masters (5) in 1997, 2001, 2002, 2005, 2019.
- US Open (3) in 2000, 2002, 2008.
- British Open (3) in 2000, 2005, 2006.
- PGA (4) in 1999, 2000, 2006, 2007.
11 वर्षानंतर त्याचे हे पहिलेच जेतेपद ठरले. त्याच्या या जेतेपदाने मात्र अॅड्युचीला मालामाल केले.
James Adducci with his winning tickets. “I feel fortunate that @WilliamHillUS allowed me to place the wager” pic.twitter.com/VqJqh3BhQX
— GamingToday (@GamingTodayNews) April 15, 2019
''टायगर वूड्सचे जिंकणे हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे,'' असे अॅड्युचीने सांगितले.