ज्ञानदीप, पोद्दार संघ अजिंक्य

By Admin | Published: August 16, 2014 11:07 PM2014-08-16T23:07:59+5:302014-08-16T23:07:59+5:30

औरंगाबाद : पीईएसच्या क्रीडा संकुलावर झालेल्या सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत ज्ञानदीप विद्यालय, पोद्दार आणि मोईन उल उलूम हायस्कूल संघाने विजेतेपद पटकावले.

Gondadeep, Poddar Sangh Ajinkya | ज्ञानदीप, पोद्दार संघ अजिंक्य

ज्ञानदीप, पोद्दार संघ अजिंक्य

googlenewsNext
ंगाबाद : पीईएसच्या क्रीडा संकुलावर झालेल्या सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत ज्ञानदीप विद्यालय, पोद्दार आणि मोईन उल उलूम हायस्कूल संघाने विजेतेपद पटकावले.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात ज्ञानदीप विद्यालयाने पोद्दार आयसीएसईचा १-० असा पराभव केला. विजयी संघातर्फे प्रीती वडमारे हिने निर्णायक गोल केला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात पोद्दार आयसीएसईने पोद्दार सी.बी.एस.ई संघावर २-१ अशी मात केली. विजयी संघाकडून अभिषेक पवार आणि तनिष्क देशमुख याने, तर प्रतिस्पर्धी संघाकडून श्रुतिक अन्नदाते याने गोल केला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात मोईन उल उलूम संघाने लिटल फ्लॉवर संघावर १-० अशी मात केली. विजयी संघाकडून शोएब शेखने गोल केला.

Web Title: Gondadeep, Poddar Sangh Ajinkya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.