गोलंदाजीस चांगली मदत

By admin | Published: January 24, 2017 12:36 AM2017-01-24T00:36:06+5:302017-01-24T00:36:06+5:30

भारतीय संघ पाच महिन्यांनंतर होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी आता वन-डे सामना खेळणार नाही. पण कर्णधार विराट कोहलीला

Good bowling support | गोलंदाजीस चांगली मदत

गोलंदाजीस चांगली मदत

Next

कोलकाता : भारतीय संघ पाच महिन्यांनंतर होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी आता वन-डे सामना खेळणार नाही. पण कर्णधार विराट कोहलीला याबाबत चिंता नाही. टी-२० क्रिकेट अधिक खेळल्यामुळे संघाला ५० षटकांच्या सामन्यातील डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करण्यास मदत मिळेल, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.
भारतीय संघाला रविवारी अखेरच्या वन-डे लढतीत पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा सफाया करता आला नाही. आता भारत जून महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी वन-डे सामना खेळणार नाही. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना कोहली म्हणाला, ‘‘वन-डे सामना खेळण्याची संधी मिळणार नसल्याचा काही परिणाम होणार नाही. आम्ही जेवढे अधिक टी-२० सामने खेळू त्याचा लाभ वन-डेमध्ये डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करण्यास होईल याचा आम्हाला नक्कीच लाभ मिळेल.’’
इंग्लंडमधील वातावरणाबाबत बोलताना कोहली म्हणाला, ‘‘तेथे धावा कशा वसूल करता येतील, याचा विचार करणे आवश्यक आहे. तंत्र मजबूत असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये धावा करणे शक्य होते.’’ फलंदाजांसाठी अनुकूल ठरलेल्या मालिकेत भारताच्या सलामीवीरांना छाप सोडता आली नाही. पण कर्णधाराने शिखर धवन अ‍ॅन्ड कंपनीची पाठराखण केली. विराट म्हणाला, ‘‘खेळाडूंना सूर गवसण्यासाठी वेळ देणे आवश्यक असते. आपल्या सलामीवीरांचे मनोधैर्य कायम राखणे गरजेचे आहे. एक-दोन तांत्रिक बाबींची उणीव दूर केली म्हणजे त्यांना नक्की सूर गवसेल.’’(वृत्तसंस्था)
आश्विनच्या सान्निध्यात राहायला आवडले असते : रसूल
४भारतीय संघात खेळणारा काश्मीर खोऱ्यातील पहिला क्रिकेटपटू अशी रसूलची ओळख आहे. तो म्हणाला, ‘‘आश्विनला विश्रांती देण्यात आली हे माहीत नव्हते. मला बीसीसीआय कार्यालयातून फोन आला त्या वेळी आश्विनसोबत वास्तव्य करायला व त्याच्याकडून टीप्स घ्यायला मिळेल, म्हणून मी आनंदी झालो. आश्विनसारख्या खेळाडूसोबत सात दिवस वास्तव्य म्हणजे बरेच काही शिकणे असा अर्थ आहे.’’
४मी मुश्ताक अली ट्रॉफीसाठी जम्मूत राज्य संघासोबत सराव करीत होतो. सकाळी बीसीसीआयमधून फोन आला. आता मी दिल्लीकडे रवाना होत आहे. २०१४ मध्ये ढाका येथे बांगला देशविरुद्ध एकमेव वन-डे खेळल्यानंतर गोलंदाज म्हणून माझ्यात फार सुधारणा घडल्याचे रसूलने सांगितले.
४यंदा रणजी करंडकाआधी एनसीएत केवळ फिरकीपटूंसाठी शिबिर झाले. तेथे मला नरेंद्र हिरवाणी आणि निखिल चोप्रा यांचे मार्गदर्शन मिळाले.
एनसीएतील २० दिवस माझ्यासाठी लाभदायी ठरले. गोलंदाजीचे आकलन करण्याची संधी मिळाली, असे रसूलचे मत आहे.
यंदा रणजी करंडकात ३८ गडी बाद करणारा रसूल झटपट क्रिकेटमध्ये चेंडू हवेत वेगाने फेकतो. इंग्लंडविरुद्ध सराव सामन्यात भारत अ कडून ३८ धावांत तीन गडी बाद केल्यामुळे भारतीय संघात स्थान मिळाले असावे, असे रसूलचे मत आहे. रसूलला आता टीम इंडियाचे मुख्य कोच आणि दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याविषयी रसूल म्हणाला, ‘‘मला कुंबळेंसोबत फार वेळ चर्चा करण्याची संधी मिळाली नाही. आता मात्र बरेच काही शिकायला मिळेल, अशी आशा आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएल खेळणारा रसूल विराटच्या नेतृत्वात देशासाठी विशेष कामगिरी करण्यास उत्सुक आहे.’’
आश्विन, जडेजा यांना टी-२० साठी विश्रांती
नवी दिल्ली : कसोटी आणि वन-डे मालिकेतील विजयात मोलाची भूमिका बजाविणारे रविचंद्रन आश्विन, तसेच रवींद्र जडेजा यांना इंग्लंडविरुद्ध तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. लेगस्पिनर अमित मिश्रा, तसेच आॅफस्पिनर परवेझ रसूल या दोघांचे स्थान घेतील.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय निवड समितीने संघव्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर आश्विन, जडेजा यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. अमित मिश्रा आणि परवेझ रसूल हे त्यांचे स्थान घेतील. मालिकेतील पहिला सामना कानपूर येथे २६ जानेवारीला, दुसरा सामना नागपुरात २९ जानेवारीला, तसेच तिसरा सामना १ फेब्रुवारी रोजी बंगळुरूयेथे होईल. ३४ वर्षांच्या मिश्राने मागचा वन-डे सामना न्यूझीलंडविरुद्ध आॅक्टोबरमध्ये खेळला.
त्याने १८ धावांत पाच गडी बाद केले होते. तो इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठी संघात होता, पण एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. रसूल एकमेव वन-डे २०१४ मध्ये खेळला, पण आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्याचा त्याला अनुभव नाही. रणजी करंडकातील शानदार कामगिरीमुळे त्याला संघात निवडण्यात आले.

Web Title: Good bowling support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.