गूड न्यूज... भारताची अपूर्वी चंडेला ठरली जगात नंबर वन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 05:10 PM2019-05-01T17:10:28+5:302019-05-01T17:11:06+5:30
या क्रमवारीच्या दुसऱ्या स्थानावरही भारताच्याच अंजुम मोदगिल आहे.
नवी दिल्ली : भारताची महिला नेमबाज अपूर्वी चंडेला जगात नंबर वन ठरली आहे. महिलांच्या १० मी. एअर रायफल स्पर्धेच्या क्रमवारीत अपूर्वीने अव्वल स्थान पटकावले आहे. या क्रमवारीच्या दुसऱ्या स्थानावरही भारताच्याच अंजुम मोदगिल आहे.
जगात अव्वल ठरल्यावर अपूर्वी म्हणाली की, " आतापर्यंत केलेल्या कामगिरीचे हे फळ आहे. ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. कारण यामुळे माझ्या कारकिर्दीला अधिक बळकटी येऊ शकते."
अपूर्वीने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या वर्ल्डकपमध्ये २५२.९ गुणांसह सुवर्णपदक पटकावले होते. त्यावेळी अपूर्वीने विश्व विक्रमालाही गवसणी घातली होती. त्याचबरोबर अपूर्वीने २०१४ साली ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर २०१८ साली गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. गेल्यावर्षी झालेल्या आशियाई स्पर्धेतील १० मी. मिश्र रायफल गटामध्ये अपूर्वीने कांस्यपदक पटकावले होते.