आनंद चांगला खेळाडू, त्याने खेळत राहायला हवे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 03:48 AM2020-01-09T03:48:05+5:302020-01-09T03:48:13+5:30
भारताचा दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद याने आपल्या कारकिर्दीतील आघाडीचा काळ संपल्यावरदेखील चांगला खेळ केला आहे.
चेन्नई : ‘भारताचा दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद याने आपल्या कारकिर्दीतील आघाडीचा काळ संपल्यावरदेखील चांगला खेळ केला आहे. त्याने अजून काही वर्षे खेळत राहावे,’ असे मत रशियाचा माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू ब्लामिदीर क्रॅमनिक याने व्यक्त केले आहे.
क्रॅमनिक २००६ ते २००७ या काळात विश्वविजेता ठरला होता. आनंद याने २००८ मध्ये ४४ व्या वर्षांच्या क्रॅमनिकला पराभूत करत विजेतेपद पटकावले होते. मंगळवारी सायंकाळी रशियाच्या या खेळाडूने म्हटले की, ‘आनंद आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम काळातून बाहेर आला आहे. तो कदाचित आता पूर्वीसारखा सर्वोत्तम खेळाडू राहिलेला नसेल, मात्र आपल्या वयाच्या तुलनेत तो उत्तम खेळाडू आहे. या काळात या वयात आघाडीचा खेळाडू बनणे हेच मोठे यश आहे.’ (वृत्तसंस्था)