भारताची चांगली सुरूवात, बिनबाद ६७

By admin | Published: January 23, 2016 09:04 AM2016-01-23T09:04:50+5:302016-01-23T13:43:54+5:30

ऑस्ट्रेलियाच्या ३३१ धावांचा पाठलाग करताना भारताने १० षटकांत ६७ धावा केल्या आहेत.

Good start of India, without exception, 67 | भारताची चांगली सुरूवात, बिनबाद ६७

भारताची चांगली सुरूवात, बिनबाद ६७

Next

ऑनलाइन लोकमत

सिडनी, दि. २३ -  ऑस्ट्रेलियाच्या ३३१ धावांचा पाठलाग करताना भारताने १० षटकांत ६७ धावा केल्या असून शिखर धवन ४७ तर रोहित शर्मा २० धावांवर खेळत आहे.

तत्पूर्वी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या ५ व्या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर विजयासाठी ३३१ धावांचे लक्ष्य आहे. डेव्हिड वॉर्नर (१२२) आणि मायकेल मार्श (नाबाद १०२) यांच्या झुंजार शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ७ गडी गमावून ३३० धावा केल्या. या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणा-या भारताचा गोलंदाज जसप्रित भुमरा तसेच इशांत शर्माने प्रत्येकी २ तर उमेश यादव व ऋषी धवनने प्रत्येकी १ बळी टिपला.

नाणफेक जिंकून भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच षटकांत अॅरॉन फिंचचा (६) बली मिळाल्याने तो यशस्वी ठरल्याचे दिसले. मात्र त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने चिवटपणे फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. एकीकडे कर्णधार स्मिथसह(२८) ऑस्ट्रेलियाचे जॉर्ज बेली (६), शॉन मार्श (७), मॅथ्यू वेड (३६), फॉकनर (१) पटापट तंबूत परतले, मात्र वॉर्नर आणि त्याच्यानंतर मायकेल मार्शने टिच्चून फलंदाजी करत झुंजार शतके ठोठावली. एकदिवसीय सामन्यातील मार्शचे हे पहिलेच शतक असून त्याच्या नाबाद १०२ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने एकूण ३३० धावांचा टप्पा गाठला. 

पाच सामन्यांच्या या मालिकेतील चारही सामने भारताने गमावले असून हा अखेरचा सामना तरी जिंकून 'क्लीन स्वीप' टाळण्याचा भारताचा प्रयत्न असेल, मात्र त्यासाठी भारतीय फलंदाजांना अतिशय चिवट फलंदाजी करत चांगला खेळ करण्याची गरज आहे. 

या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल करण्यात आले असून कर्णधार धोनीने जलदगती गोलंदाज जसप्रीत भुमराला पदार्पणाची संधी दिली तर जखमी अजिंक्य रहाणेच्या जागी मनिष पांडेला घेण्यात आले आहे.  ऑस्ट्रेलियानेही संघातही दोन बदल केले आहेत. ग्लेन मॅक्सवेल व केन रिचर्डसन यांच्याजागी शॉन मार्श व बोलँड यांना संधी देण्यात आली आहे.

 

Web Title: Good start of India, without exception, 67

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.