‘दिलस्कूप’च्या जन्मदात्याने घेतला निरोप

By admin | Published: September 10, 2016 03:48 AM2016-09-10T03:48:54+5:302016-09-10T03:48:54+5:30

श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या डावात अवघ्या एक धाव काढून बाद झाला.

Goodbye's birthday | ‘दिलस्कूप’च्या जन्मदात्याने घेतला निरोप

‘दिलस्कूप’च्या जन्मदात्याने घेतला निरोप

Next


आंतरराष्ट्रीय क्रिकेटला हटके असा ‘दिलस्कूप’ फटक्याची भेट देणारा आणि श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या डावात अवघ्या एक धाव काढून बाद झाला. मात्र, यावेळी संघसहकाऱ्यांनी गार्ड आॅफ आॅनर सादर करत दिलशानला भावूक निरोप दिला.आॅस्टे्रलियाविरुध्द शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात जेव्हा दिलशान फलंदाजीला उतरला तेव्हा, श्रीलंकाई खेळाडूंनी बॅट हवेत उंचावून दिलशानला ‘गार्ड आॅफ आॅनर’ दिला. मात्र, दिलशानची अखेरची खेळी अपयशी ठरली. आपल्या अखेरच्या खेळीत ३ चेंडूत केवळ एक धावा काढण्यात दिलशानला यश आले. जॉन हेस्टिग्सच्या चेंडूवर डेव्हीड वॉर्नरकडे झेल देऊन दिलशान माघारी परतला.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हटके आणि आकर्षक असा ‘दिलस्कूप’ शॉटचा जन्मदाता असलेल्या दिलशानचा हा ४९७ वा आंतरराष्ट्रीय सामना होता. १९९९ साली सनथ जयसूर्याच्या नेतृत्त्वाखाली दिलशानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.दिलशानने मार्च २०१३ साली कोलंबो येथे बांगलादेशविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला. तसेच, नुकताच २८ आॅगस्टला दाम्बुला येथे आॅस्टे्रलियाविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला.
दिलशानने ८७ कसोटी सामन्यांत ५४९२ धावा काढल्या असून ३३० एकदिवसीय सामन्यांत १० हजार २९० धावा केल्या आहेत. तर, ८० टी२० सामने खेळताना त्याने १८८९ धावा काढल्या आहेत.
>क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये दिलशानचे योगदान शानदार आहे. त्याने बलाढ्य फलंदाज म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु, नंतर खेळाच्या व संघाच्या आवश्यकतेनुसार दिलशानने आपल्या खेळामध्ये बदल केला. मार्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दिलशानने सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आयसीसीच्या वतीने दिलशानचे त्याच्या शानदार कारकिर्दीसाठी अभिनंदन करतो तसेच पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो. - डेव्हीड रिचर्डसन, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयसीसी

Web Title: Goodbye's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.