गोपी २५ तर खेताराम २६ व्या क्रमांकावर
By admin | Published: August 22, 2016 04:55 AM2016-08-22T04:55:37+5:302016-08-22T04:55:37+5:30
भारताचे गोपी थोनकाल आणि खेतारामला पुरुषांच्या ४२.१९५ किलो मीटर मॅरेथॉन शर्यतीत अनुक्रमे २५ व २६ व्या क्रमांकावर समाधान मानवे लागले.
रिओ : भारताचे गोपी थोनकाल आणि खेतारामला पुरुषांच्या ४२.१९५ किलो मीटर मॅरेथॉन शर्यतीत अनुक्रमे २५ व २६ व्या क्रमांकावर समाधान मानवे लागले. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणहे या दोघांनी यावेळी आपल्या वैयक्तीक कामगिरीत सुधारणा केली.
शर्यत सुरु झाल्यावर नेहमी प्रमाणे केनिया, इथोपिया, अमेरिका, नेदरलॅँड, कॅनाडा संघाचे धावपटू आघाडीवर होते. यांच्यातील दुसऱ्या बेल्जियम, नॉर्वे, जापान, रशिया या धावपटूंच्या घोळक्यात भारताचे गोपी व खेताराम सुध्दा होते. नंतर त्यांना वेगात सातत्य राखता आले नाही.
शेवटच्या १० किलोमीटर पर्यंत ते २५व २६ व्या क्रमाकांवर राहिले. हा त्यांचा क्रमांक शेवटपर्यत बदलला नाही. गोपीने २ तास १५ मिनिट २५, तर खेतारामने २ तास १५ मिनिट २६ सेकंदाची नोंदविली. गोपी पहिल्या स्थानावर आलेल्या केनियाच्या किपचागी इलूडपेक्षा ६ मिनिट ४१ सेकंद तर खेताराम ६ मिनिट ४२ सेकंद मागे होता. गोपीने स्वत:ची २ तास १६ मिनिट १५ सेकंदाची वेळ मागे टाकली. खेतारामनेही वेळेत २ मिनिटांनी सुधारणा केली. त्याचवेळी भारताच्या नित्तेंदरसिंहला ८४व्या क्रमांकावर समाधान मानवे लागले. त्याने २ तास २२ मिनिट ५२ सेकंदात ही शर्यत पूर्ण केला.