ठरलं ! रविवारी भारत - पाकिस्तान भिडणार
By admin | Published: June 15, 2017 10:10 PM2017-06-15T22:10:25+5:302017-06-15T22:36:51+5:30
भारतीयांसाठी 18 तारखेला येणारा रविवार हा खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरणार आहे.
ऑनलाइन लोकमत
ओव्हल, दि. 15 - भारतीयांसाठी 18 तारखेला येणारा रविवार हा खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरणार आहे. भारतीय फलंदाजांचा एकंदरीत सुधारलेला फॉर्म पाहता अंतिम सामन्यात पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमधील लढत रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भारत आणि पाकिस्तान या अंतिम सामन्याच्या लढतीत दोन्ही संघ जबरदस्त खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेटरसिक खऱ्या अर्थाने रविवारची पर्वणी मिळणार आहे. 10 वर्षांनंतर ICC चॅम्पियन ट्रॉफीच्या निमित्तानं भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. याआधी 2007ला झालेल्या ICC टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दोन्ही देश एकमेकांना भिडले होते. भारतीय संघ लागोपाठ दुस-यांदा ICC चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये दाखल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चमकदार कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वासही उंचावलेला आहे. आता बांगलादेशलाही धडा शिकवल्यामुळे भारताच्या कामगिरीत चांगलीच सुधारणा झाली आहे. भारतीय फलंदाज फॉर्मात असून गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत, त्याप्रमाणेच क्षेत्ररक्षणही सुधारले आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली रविवारी भारत नक्कीच विजय खेचून आणेल, अशीच विराटच्या चाहत्यांना आशा आहे. युवराज सिंग कारकिर्दीतील 300वा सामना खेळून खिशात घातला आहे.
भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या चांगले गोलंदाज भारताजवळ असल्यानं भारताची बाजू मजबूत आहे. कागदावर भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र तरीही भारतीय संघ या शेजारी देशाच्या संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. जर भारतानं विजय मिळवला तर क्रिकेट इतिहासात या विजयाची सर्वात मोठ्या विजयांमध्ये नोंद होईल.