एएचएफच्या उपाध्यक्षपदी सरकार यांची निवड
By admin | Published: February 22, 2017 01:15 AM2017-02-22T01:15:21+5:302017-02-22T01:15:21+5:30
भारताच्या अभिजित सरकार यांची आशियाई हॉकी महासंघाने (एएचएफ) उपाध्यक्षपदी निवड केली. त्याचप्रमाणे,
नवी दिल्ली : भारताच्या अभिजित सरकार यांची आशियाई हॉकी महासंघाने (एएचएफ) उपाध्यक्षपदी निवड केली. त्याचप्रमाणे, एएचएफने आर्थिक आणि टीव्ही समितीच्या प्रमुखपदीही सरकार यांची नेमणूक केली आहे. २००४ सालापासून सरकार सहारा परिवाराशी जोडले गेले आहेत.
७ फेब्रुवारी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीतील निर्णयाच्या आधारे सरकार यांची निवड झाली आहे. सरकार यांनी आपल्या निवडीबाबत सांगितले की, ‘आशियाई हॉकी महासंघाच्या या पदासाठी माझी निवड झाली, ही सन्मानाची बाब आहे.
अनेक वर्षे खेळांच्या विकासासाठी कार्य केल्यानंतर, आता हॉकी खेळणाऱ्या सर्व आशियाई देशांच्या यशासाठी आणि आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये छाप पाडण्यासाठी त्यांना मदत करण्यास इच्छुक आहे.’
गेल्या काही काळापासून सरकार भारतीय हॉकीच्या प्रगतीमध्ये जोडले गेले आहेत. त्यांच्याच नेतृत्वामध्ये सहारा इंडियाने हॉकी इंडिया लीगमध्ये उत्तर प्रदेश विजार्ड संघाला खरेदी केले होते. (वृत्तसंस्था)