भाविना पटेलच्या कामगिरीवर सरकार खुश, रौप्य पदकानंतर बक्षिसांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 05:23 PM2021-08-29T17:23:53+5:302021-08-29T17:38:31+5:30
ऑलिंपिक स्पर्धेतील Class 4 च्या अंतिम लढतीत भाविनाचा यिंग झोयूने पराभव केला. यावेळी चीनच्या यिंग झोयूने भाविनावर 3-0 (11-7, 11-5, 11-6 ) असा शानदार विजय मिळवला.
अहमदाबाद - टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची टेबल टेनिसपटू भाविना पटेल हिला Class 4 च्या अंतिम फेरीत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. Class 4 च्या अंतिम लढतीत भाविनाचा सामना चीनच्याच यिंग झोयूशी झाला आहे. भावनाच्या विजयानंतर देशभरातून तिचं कौतुक होत आहे. तसेच, तिच्यावर बक्षिसांचा वर्षावही सुरू आहे. गुजरात सरकारने तिच्या चंदेरी कामगिरीची दखल घेत राज्य सरकारकडून 3 कोटी रुपये बक्षीस जाहीर केलं आहे.
ऑलिंपिक स्पर्धेतील Class 4 च्या अंतिम लढतीत भाविनाचा यिंग झोयूने पराभव केला. यावेळी चीनच्या यिंग झोयूने भाविनावर 3-0 (11-7, 11-5, 11-6 ) असा शानदार विजय मिळवला. दरम्यान, पॅरालिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिस खेळात अंतिम फेरी गाठणारी भाविना पहिलीच भारतीय खेळाडू आहे. भावनाच्या या कामिगिरीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक दिग्गजांनी तिचं अभिनंदन करत कौतुक केलंय. आता, तिच्यावरही बक्षिसांचा वर्षाव होत आहे.
CM Shri @vijayrupanibjp announces a cash prize of ₹ 3 crore for Bhavina Patel, a para-paddler from Mehsana district, under the State Govt's 'Divyang Khel Ratna Protsahan Puraskar Yojana' for her historic achievement at the #TokyoParalympics
— CMO Gujarat (@CMOGuj) August 29, 2021
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिव्यांग खेलरत्न प्रोत्साहन पुरस्कार योजनेचा तीन कोटी रुपयांच्या रोख रकमेचा पुरस्कार जाहीर केला आहे. दरम्यान, यापूर्वी टेबल टेनिस ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि हरयाणाचे मुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी भाविना पटेलच्या यशानंतर तिला 31 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
यापूर्वीही अनेक स्पर्धेत मिळवले रौप्य
भाविनाने तेरा वर्षांपूर्वी अहमदाबाद शहरातल्या वस्त्रापूर भागात टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली. भाविना व्हीलचेअरवर बसून खेळते. बाराव्या वर्षी तिला पोलिओ असल्याचे स्पष्ट झाले. या आजाराने खचून न जाता भविनाने दमदार वाटचाल केली आहे. 2011 मध्ये भाविनाने थायलंड इथे झालेल्या अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करत जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी झेप घेतली होती. 2013मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या आशियाई पॅरा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भाविनाने रौप्यपदक पटकावले होते.
The remarkable Bhavina Patel has scripted history! She brings home a historic Silver medal. Congratulations to her for it. Her life journey is motivating and will also draw more youngsters towards sports. #Paralympics
— Narendra Modi (@narendramodi) August 29, 2021
सुवर्णपदकाने दिली हुलकावणी
भाविनाने जॉर्डन, तैवान, चीन, दक्षिण कोरिया, जर्मनी, इंडोनेशिया, स्लोव्हेनिया, थायलंड, स्पेन, नेदरलॅण्डस, इजिप्त येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने भाग घेतला, पदकं मिळवली. पण, सुवर्ण पदक मात्र कायम तिला हुलकावणी देत राहिले.