सरकारची परवानगी आवश्यक

By admin | Published: December 11, 2015 12:31 AM2015-12-11T00:31:11+5:302015-12-11T00:31:11+5:30

भारत-पाक क्रिकेट मालिकेच्या आयोजनावरून सुरू असलेल्या तमाम वावड्यांना पूर्णविराम देऊन बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी सरकारच्या परवानगीशिवाय कुठलेही पाऊल उचलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Government permission is necessary | सरकारची परवानगी आवश्यक

सरकारची परवानगी आवश्यक

Next

नवी दिल्ली : भारत-पाक क्रिकेट मालिकेच्या आयोजनावरून सुरू असलेल्या तमाम वावड्यांना पूर्णविराम देऊन बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी सरकारच्या परवानगीशिवाय कुठलेही पाऊल उचलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी बोलताना ठाकूर म्हणाले, ‘‘भारत- पाक मालिकेबाबत सरकार
जोवर निर्णय घेत नाही, तोपर्यंत बीसीसीआय काहीच करू शकत नाही. गेल्या वर्षी ९ एप्रिल रोजी आयसीसी वेळापत्रकानुसार भारताला पुढच्या
८ वर्षांत पाकविरुद्ध ६ मालिका खेळायच्या होत्या. याअंतर्गत पाकला डिसेंबर महिन्यात यूएईत मालिकेचे आयोजन करायचे आहे.
अलीकडे बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर आणि पीसीबी प्रमुख शहरयार खान हे दुबईत भेटले तेव्हा लहान मालिकेचे आयोजन लंकेत करण्याविषयी एकमत झाले. आम्ही संघाच्या परवानगीसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर कुठलेही उत्तर मिळालेले नाही. मालिका खंडित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या ३० वर्षांत विविध कारणांस्तव अनेकदा मालिका होऊ शकलेली नाही.’’
परराष्ट्रमंत्र्यांच्या पाक दौऱ्यामुळे मालिका आयोजनाची आशा पल्लवित झाली होती; पण सरकार हिरवी झंडी देत नसल्याने सर्व
थांबले असल्याचे सांगून ठाकूर म्हणाले, ‘‘शहरयार खान यांनी
दोन दिवसांची मुदत दिल्याचे मीडियातून कळाले; अधिकृत
पत्र मिळालेले नाही. मालिका आयोजनाची पीसीबीची वेळ असल्याने मालिका कधी आयोजित करायची, हा त्यांचा प्रश्न आहे.’’
मालिका आयोजनाला फार
कमी वेळ असल्याबद्दल विचारताच राजीव शुक्ला म्हणाले, ‘‘आम्ही सरकारला वेळेची मर्यादा देऊ
शकत नाही. निर्णय घेणे सरकारचे काम आहे. सरकारचा निर्णय
सर्वांना बंधनकारक असेल. सरकारचा निर्णय येईपर्यंत मालिकेच्या भविष्यावर बोलणे अर्थहीन ठरेल.’’
(वृत्तसंस्था)
...तर क्रिकेट
संपेल काय?:युसूफ
कराची : भारत-पाक यांच्यात क्रिकेट मालिका झाली नाही, तरी विश्व क्रिकेटला फरक पडणार नाही. भारत पाकसोबत खेळलाच, तर पाकची तिजोरी भरण्यापलीकडे काहीही होणार नाही. पाक क्रिकेटला लाभ होणार नाही.

 

Web Title: Government permission is necessary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.