सरकार खेळाडूंना मदत करण्यास तत्पर : नरेंद्र मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 01:04 AM2018-02-01T01:04:45+5:302018-02-01T01:04:56+5:30
देशात खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहित करणा-या ‘खेलो इंडिया’ची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात खेळातील गुणवत्तेला कमतरता नाही आणि सरकार खेळाशी प्रेम असणा-या व जे समर्पण भावनेने खेळतात अशा खेळाडूंना मदत करू इच्छिते, असे सांगितले.
नवी दिल्ली - देशात खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहित करणाºया ‘खेलो इंडिया’ची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात खेळातील गुणवत्तेला कमतरता नाही आणि सरकार खेळाशी प्रेम असणा-या व जे समर्पण भावनेने खेळतात अशा खेळाडूंना मदत करू इच्छिते, असे सांगितले.
मोदी यांच्या हस्ते ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचे उद्घाटन झाले. युवकांच्या जीवनात खेळाला मुख्य स्थान असायला हवे. खेळ व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून खेळासाठी वेळ काढा व खेळास प्राथमिकता द्या. आज आम्ही अनेक अडथळे पार करून इतरांपेक्षा वेगळे सिद्ध करणाºया दिग्गज खेळाडूंदरम्यान आहोत, असे ते म्हणाले. मोदी म्हणाले की, ‘देशात खेळातील गुणवत्तेत कमतरता नाही. आमचा युवा देश आहे आणि आम्ही खेळाच्या विभागात आणखी सरस करू शकतो.
जेव्हा आम्ही भारत जागतिक पातळीवर प्रगती करीत आहे याचा अर्थ फक्त आमची सेनाच मजबूत होत आहे; अथवा अर्थव्यवस्था सुदृढ होत आहे एवढाच नाही. भारतात असे काही जण आहेत त्यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यात वैज्ञानिक, कलाकार आणि खेळाडूंचा समावेश आहे. भारत प्रगतीची नवीन उंची गाठेल, याचा मला विश्वास वाटतो.’ (वृत्तसंस्था)