देशी खेळांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसार व्हावा : गोयल

By admin | Published: February 10, 2017 02:22 AM2017-02-10T02:22:05+5:302017-02-10T02:22:05+5:30

केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी कबड्डीसारख्या देशी खेळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार होण्यावर जोर देताना युवकांनीही हे खेळ खेळावेत, असे आवाहन केले.

Goyal should promote domestic sports at international level: Goel | देशी खेळांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसार व्हावा : गोयल

देशी खेळांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसार व्हावा : गोयल

Next

नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी कबड्डीसारख्या देशी खेळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर
प्रसार होण्यावर जोर देताना युवकांनीही हे खेळ खेळावेत, असे आवाहन केले.
क्रीडामंत्र्यांनी सोनिपत येथे पहिल्या अखिल भारतीय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेचा मुख्य उद्देश कबड्डी हा खेळ युवकांत आवडावा आणि देशी खेळांचा प्रसार करणे, हा
आहे. हरियाणाचे क्रीडामंत्री
अनिल विज हेदेखील या प्रसंगी उपस्थित होते.
ते म्हणाले, ‘‘अहमदाबाद येथे भारताने नुकताच कबड्डी वर्ल्डकप जिंकला. भारताने या खेळाला जागतिक पातळीवर लोकप्रिय बनवले आहे. आपल्या मते, देशी खेळांविषयी युवकांत आवड निर्माण व्हायला हवी. कबड्डी आपल्या देशाचा प्राचीन आणि लोकप्रिय खेळ आहे. याचे आयोजनदेखील कमी खर्चात केले जाऊ शकते. आपल्याला याचा दर्जा उंचवावा लागेल.’’
क्रीडा मंत्रालयातर्फे खेलो इंडिया योजनेअंतर्गत लवकरच ग्रामीण खेळ महाकुंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण खेळांना प्रोत्साहन मिळेल आणि प्रतिभावान युवा खेळाडू शोधले जाऊ शकतील, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा ११ फेब्रुवारीपर्यंत चालेल. त्यात विजेत्या संघाला एक कोटी रुपये, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहणाऱ्या संघांना अनुक्रमे ५० लाख व २५ लाख रुपये ही बक्षीस रक्कम प्रदान केली जाईल. (वृत्तसंस्था)

Web Title: Goyal should promote domestic sports at international level: Goel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.