ग्रॅमी स्मिथचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे संकेत
By Admin | Published: December 8, 2015 06:34 PM2015-12-08T18:34:49+5:302015-12-08T18:39:56+5:30
निवृत्त झालेला दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.
ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. ८ - दक्षिण आफ्रिकन संघाच्या भारता विरुध्दच्या सुमार प्रदर्शनानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. दक्षिण आफ्रिकन संघाची सध्याची खालावलेली कामगिरी पाहता माझा पुनरागमनाचा विचार सुरु असल्याचे स्मिथने सांगितले. स्मिथ मास्टर्स चॅम्पियन्स लीगमध्ये वीरगो सुपर किंग्ज संघाकडून खेळणार आहे.
एमसीएल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा मंच ठरु शकतो असे स्मिथने म्हटले आहे. नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत भारताने दक्षिण आफ्रिकेचा अत्यंत दारुण पराभव केला. भारताने ३-० ने मिळवलेल्या विजयात दोन कसोटी सामन्यांचा निकाल तर, अवघ्या तीन दिवसात लागला होता. फिरकी गोलंदाजी खेळताना तंत्राचा अभाव असल्याने दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज अक्षरक्ष चाचपडत खेळत होते.