ट्रेनमध्ये "दादा"ने केले प्रवाशासोबत भांडण
By admin | Published: July 17, 2017 12:25 AM2017-07-17T00:25:40+5:302017-07-17T00:25:40+5:30
भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी ट्रेनमध्ये प्रवास केला आणि एका प्रवाशासोबत सिटसाठी त्यांचे भांडणही झाले.
कोलकाता : भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी ट्रेनमध्ये प्रवास केला आणि एका प्रवाशासोबत सिटसाठी त्यांचे भांडणही झाले.
शनिवारी सौरव गांगुली सिलीगुडीतील बेलूरघाटमध्ये आपल्या प्रतिमेचे उद््घाटन करण्यासाठी गेले असताना ही घटना घडली. गांगुली यांनी सियालदाहमध्ये बंगाल क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव अभिषेक दालमिया यांच्या साथीने पदातिक एक्स्प्रेसने प्रवास केला. १५ वर्षांनंतर ते रेल्वेने प्रवास करीत होते. राखीव जागेनुसार गांगुली यांना एसी फर्स्ट क्लासमध्ये स्थान मिळाले होते.
गांगुली यांनी सांगितले की, ‘ज्यावेळी मी माझ्या कम्पार्टमेंटमध्ये दाखल झालो त्यावेळी तेथे अन्य प्रवासी प्रवास करीत असल्याचे माझ्या निदर्शनास आले.’ गांगुलीने त्याच्यासोबत चर्चा केली, पण तो सिट सोडण्यास तयार नव्हता. त्यामुळे गांगुलीचा त्याच्यासोबत वाद झाला.
त्यानंतर गांगुली स्वत: ट्रेनच्या डब्यातून खाली उतरले. एका दिग्गज खेळाडूला बघितल्यानंतर रेल्वे स्थानकावर उपस्थित लोक त्याच्याकडे धावले. त्यानंतर आरपीएफने मोठ्या प्रयत्नाने गर्दीवर नियंत्रण मिळवले, पण त्यांना मुख्य अडचण सोडविता आली नाही. शेवटी मोठ्या वादानंतर गांगुलीला एसी टू कम्पार्टमेंटमध्ये एक सिट देण्यात आली. त्यामुळे गांगुलीसाठी हा संस्मरणीय प्रवास म्हणजे एक कटू अनुभव ठरला. (वृत्तसंस्था)