ग्रँट इलियटने जाहीर केली एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती
By admin | Published: April 2, 2016 01:18 AM2016-04-02T01:18:35+5:302016-04-02T01:18:35+5:30
विश्वचषक टष्ट्वेंटी-२0 स्पर्धेत जबरदस्त कामगिरीनंतरही विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद झालेल्या न्यूझीलंड संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्रँट इलियटने एकदिवसीय क्रिकेटमधून
Next
आॅकलंड : विश्वचषक टष्ट्वेंटी-२0 स्पर्धेत जबरदस्त कामगिरीनंतरही विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद झालेल्या न्यूझीलंड संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्रँट इलियटने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
इलियटने गतवर्षी वनडे वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये आफ्रिकेच्या डेल स्टेनला षट्कार ठोकत न्यूझीलंडला अंतिम फेरीत पोहोचवण्यात निर्णायक भूमिका बजावली होती.
मी माझा अखेरचा वनडे सामना खेळला आहे. सध्या तरी कसोटी क्रिकेटविषयी मी विचार करीत नाही. मी माझ्या कसोटीची जर्सी अनेक वर्षांपासून पाहिलेली नाही; परंतु मला वाटते की, टष्ट्वेंटी-२0 साठी माझी तंदुरूस्ती अजूनही चांगली आहे.