ग्रासकोर्ट फक्त फुटबॉलसाठीच असते असे वाटत होते : ओस्टापेंको
By admin | Published: June 12, 2017 12:52 AM2017-06-12T00:52:10+5:302017-06-12T00:52:10+5:30
फ्रेंच ओपन चॅम्पियन ठरलेली येलेना ओस्टापेंको आता विम्बल्डनसाठी सज्ज आहे. तथापि, ग्रासकोर्ट टेनिससाठी नव्हे तर फक्त फुटबॉलसाठीच आहे असे आपल्याला वाटत होते, असे तिने मान्य केले.
पॅरीस : फ्रेंच ओपन चॅम्पियन ठरलेली येलेना ओस्टापेंको आता विम्बल्डनसाठी सज्ज आहे. तथापि, ग्रासकोर्ट टेनिससाठी नव्हे तर फक्त फुटबॉलसाठीच आहे असे आपल्याला वाटत होते, असे तिने मान्य केले.
टेनिसमधील नवीन स्टार खेळाडू आता विम्बल्डनमध्ये खेळणार आहे. ती २0१४ मध्ये ज्युनिअर चॅम्पियन राहिली होती. लाटिव्हियाच्या २0 वर्षीय खेळाडूने प्रबळ दावेदार आणि जागतिक क्रमवारीतील चौथ्या मानांकित सिमोना हालेप हिला काल ४-६, ६-४, ६-३ असे पराभूत करीत ग्रँडस्लॅमचे विजेतेपद पटकावले होते. हे तिचे कारकीर्दीतील पहिले विजेतेपद ठरले. ती आठव्या मोठ्या स्पर्धेत विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरली. पॅरीसमध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर ती म्हणाली, ‘‘जेव्हा मी प्रथम गवतावर खेळली होती तेव्हा मला ते आवडले नव्हते आणि मी ते समजले नव्हते. त्यावर लोक टेनिस कसे खेळतात हे मला समजत नव्हते. गवत असणारे कोर्ट फक्त फुटबॉलसाठीच असते असे मला वाटत होते; परंतु मी नंतर त्यावर कसे खेळायचे हे शिकले आणि आता मला समजू लागले. आता मला त्यावर खेळणे खूप आवडते.’’