यंग ब्रिगेडचा शानदार विजय
By Admin | Published: January 24, 2016 02:23 AM2016-01-24T02:23:17+5:302016-01-24T02:23:17+5:30
येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सराव सामन्यात तीन वेळेचा विजेता भारतीय संघाने दुबळ्या कॅनडा संघाचा ३७२ धावांनी धुव्वा उडविला.
मीरपूर : येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सराव सामन्यात तीन वेळेचा विजेता भारतीय संघाने दुबळ्या कॅनडा संघाचा ३७२ धावांनी धुव्वा उडविला. कर्णधार ईशान किशन व रिकी भुई यांची नाबाद शतके भारताच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली. किशनने ८६ चेंडूंत १३८, तर भुई याने ७१ चेंडूंत ११५ धावा केल्या. या दोघांच्या शतकांच्या जोरावर भारताने ५ गडी गमावून ४८३ धावांचा डोंगर उभारला होता.
अन्य फलंदाजांना २७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेअगोदर पूर्वअभ्यास करण्याची संधी मिळावी म्हणून दोन्ही फलंदाज रिटायर्ड झाले. प्रत्युत्तरादाखल खेळताना कॅनडाचा पूर्ण संघ ३१.१ षटकांत फक्त ११३ धावांवर तंबूत परतला. लेग स्पिनर महिपाल लिमरोर याने १९ धावा देत ३ गडी बाद केले. अन्य सामन्यांत १९९८ वर्षीचा
विजेता इंग्लंड आणि दोन वेळेचा चॅम्पियन पाकिस्तान या संघांनी सराव सामन्यात विजय मिळविला. अफगाणिस्तान व यजमान बांगलादेश हे संघही विजय मिळविण्यात यशस्वी ठरले. (वृत्तसंस्था)