महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचं निधन; वयाच्या ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By प्रविण मरगळे | Published: November 25, 2020 10:38 PM2020-11-25T22:38:50+5:302020-11-25T22:40:35+5:30

Diego Maradona dies: जगभरात त्याची खूप फॅन फॉलोइंग आहे. ड्रग्ज आणि दारूच्या व्यसनामुळे ते बर्‍याचदा वादातही राहिले होते

Great footballer Argentina soccer superstar Diego Maradona dies of heart attack | महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचं निधन; वयाच्या ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचं निधन; वयाच्या ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

googlenewsNext

ब्युनोस आर्यस : ‘हँड ऑफ गॉड’ म्हणून ओळखले जाणारे अर्जेंटिनाचे माजी दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून रजा मिळाली होती. त्यावेळी मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मॅराडोना यांनी अर्जेंटिना संघाकडून ३४ गोल करताना ९१ गोल करण्यात सहकार्य केले आहे. तसेच त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये विविध संघांकडून खेळताना एकूण २५९ गोल केले.

जगातील महान फुटबॉलपटूंमध्ये गणना होत असलेल्या मॅराडोना यांच्या निधनाने फुटबॉल विश्वावर शोककळा पसरली आहे. १९८६ साली अर्जेंटिनाने मिळवलेल्या विश्वविजेतेपदामध्ये मॅराडोना यांचे मोलाचे योगदान राहिले होते. याच स्पर्धेत त्यांनी निर्णायक असा हँड ऑफ गॉड गोल केला होता आणि यामुळे इंग्लंडला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता पकडावा लागला होता.  मॅराडोनाने बोका ज्युनियर्स, नपोली आणि बार्सिलोनासाठी क्‍लब फुटबॉल खेळला आहे. जगभरात त्याची खूप फॅन फॉलोइंग आहे. ड्रग्ज आणि दारूच्या व्यसनामुळे ते बर्‍याचदा वादातही राहिले होते

३० ऑक्टोबर रोजी त्यांनी ६० वा वाढदिवस साजरा केला

३० ऑक्टोबर रोजी माराडोना यांनी आपला ६० वा वाढदिवस साजरा केला. ड्रग्ज आणि दारूच्या आहारी गेल्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात आलं होतं, काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका बॉडीगार्डला कोरोनाचे लक्षण आढळल्यानंतर मॅराडोनाने स्वत: ला आयसोलेशनमध्ये ठेवलं होतं.

Web Title: Great footballer Argentina soccer superstar Diego Maradona dies of heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.