आयपीएल-९ चे शानदार उद्घाटन
By admin | Published: April 9, 2016 02:51 AM2016-04-09T02:51:08+5:302016-04-09T14:39:41+5:30
बॉलिवूडचा ग्लॅमरस शो आणि त्यासह झालेला ‘रॉकस्टार’ ड्वेन ब्रावोचा चॅम्पियन डान्स अशा रंगारंग सादरीकरणाने शुक्रवारी रात्री इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नवव्या सत्राचे दिमाखदार उद्घाटन झाले.
मुंबई : बॉलिवूडचा ग्लॅमरस शो आणि त्यासह झालेला ‘रॉकस्टार’ ड्वेन ब्रावोचा चॅम्पियन डान्स अशा रंगारंग सादरीकरणाने शुक्रवारी रात्री इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नवव्या सत्राचे दिमाखदार उद्घाटन झाले.
जवळपास सव्वा दोन तास रंगलेल्या या कार्यक्रमामध्ये बॉलिवूड स्टार्सनी आपली उपस्थिती दर्शवताना वरळी येथील नॅशनल स्पोटस क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) स्टेडियममध्ये जबरदस्त सादरीकरण केले. बॉलिवूड स्टार रणवीर सिंग, कतरिना कैफ, जॅकलिन फर्नांडीस आणि पंजाबी रॅपर यो यो हनी सिंग यांनी संपुर्ण कार्यक्रमात धमाल उडवून दिली. यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सर्व अधिकारी, फ्रँचाइजी संघाचे मालक, खेळाडू तसेच आठही संघांचे कर्णधार यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रेक्षकांनी सर्वात जास्त एन्जॉय केला तो डॅरेन ब्रावोचा ‘चॅम्पियन डान्स’. ब्रावोच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. तसेच अन्य एक ‘चलो चलो’ या गाण्यावरही ब्रावोने डान्स करुन प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचवले. तर प्लेबॅक सिंगर अंकित तिवारीने यावेळी ब्रावोसह ‘चॅम्पियन डान्स’ गाण्याचे इंडियन वर्जन ‘हिंदुस्तान मे बडे बडे चॅम्पियन’ गायले.