डीवाय स्टेडियमला हिरवा झेंडा
By admin | Published: October 21, 2016 01:15 AM2016-10-21T01:15:58+5:302016-10-21T01:15:58+5:30
१७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आयोजनासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेने (फीफा) कोच्चीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर नवी मुंबईच्या डॉ. डीवाय पाटील
मुंबई : १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आयोजनासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेने (फीफा) कोच्चीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर नवी मुंबईच्या डॉ. डीवाय पाटील स्टेडियमलाही मान्यता दिली आहे.
फीफा आणि स्थानिक आयोजन समितीच्या (एलओसी) २३ सदस्यांच्या संघाने कोच्ची आणि नवी मुंबईतील स्टेडियमची पाहणी केली.
येथील तयारीविषयी समाधान व्यक्त केल्यानंतर
या संघाने दोन्ही ठिकाणच्या स्टेडियमला सामना
आयोजनासाठी हिरवा झेंडा दाखवला आहे.
फीफा आणि एलओसी संघाने बुधवारी कोच्चीच्या जवाहरलाल नेहरु स्टेडियमचा दौरा केला. तर, यानंतर गुरुवारी डीवाय पाटील स्टेडियमला भेट घेऊन तेथील तयारीची माहिती घेतली.
एलओसीचे स्पर्धा निर्देशक झेवियर सेप्पी यांनी नवी मुंबईविषयी सांगितले की, ‘येथील तयारी खूप चांगल्या पध्दतीने झाली असून यासाठी खूप मेहनत घेतली गेली आहे. सर्व व्यवस्थांकडे गांभिर्याने लक्ष दिले गेले आहे आणि सर्व गोष्टी नियंत्रणात आहेत.
येथील सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत आणि मला आनंद आहे की एका मोठ्या स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी या स्टेडियमकडे दिली जात आहे. ही स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र फुटबॉलच्या विकासाच्या दिशेने टाकलेले भक्कम पाऊल असेल याचा आम्हाला विश्वास आहे.’ (वृत्तसंस्था)
१७ वर्षांखालील विश्वचषक सामन्यांच्या यजमानपदासाठी नवी मुंबईची निवड झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी मी फीफा आणि अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे मनापासून आभार मानतो.
- डॉ. विजय पाटील, अध्यक्ष - डीवाय पाटील स्पोटर््स अॅकेडमी