पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

By admin | Published: July 24, 2016 04:16 AM2016-07-24T04:16:28+5:302016-07-24T04:16:28+5:30

आगामी ५ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेआधी देशामध्ये या खेळांविषयी उत्साह निर्माण होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ जुलैला दिल्ली येथे इंडिया गेटवर ‘रन फॉर रिओ’

Green flag showing Prime Minister Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

Next

नवी दिल्ली : आगामी ५ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेआधी देशामध्ये या खेळांविषयी उत्साह निर्माण होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ जुलैला दिल्ली येथे इंडिया गेटवर ‘रन फॉर रिओ’ उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवतील.
क्रीडामंत्री विजय गोयल यांनी शनिवारी येथे झालेल्या एका कार्यक्रमात याबद्दल माहिती देताना सांगितले, ‘‘आम्ही देशात आॅलिम्पिकबाबत उत्साह निर्माण करू इच्छितो. यामुळेच इंडिया गेट येथे ‘रन फॉर रिओ’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मी ज्या वेळी याबाबत मोदी यांना कल्पना दिली, तेव्हा त्यांनी स्वत:हून या कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवण्याची इच्छा व्यक्त केली. या वेळी हजारो क्रीडाप्रेमी आॅलिम्पिक खेळाडूंना पाठिंबा दर्शवण्यासाठी धावतील.’’
विशेष म्हणजे एक आॅगस्टपासून सेंट्रल पार्क येथे भव्य स्क्रीन लावण्यात येणार आहे, ज्यावर आॅलिम्पिकचे थेट प्रसारण दाखवण्यात येईल. याविषयी गोयल म्हणाले, ‘‘सेंट्रल पार्क येथे तिरंग्याखाली मोठा स्क्रीन लावण्यात येणार असून याशिवाय येथे विजेंदरसिंगसह अन्य आॅलिम्पियन खेळाडूंचे कटआऊटही लावण्यात येतील.’’ (वृत्तसंस्था)

सानियाची आई भारतीय पथकाची फिजिओ...
आॅलिम्पिकमध्ये महिला मल्लांसह महिला फिजिओ म्हणून अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झाची आई नसीमा मिर्झा जाणार आहे. याबाबत क्रीडा सचिव राजीव यादव म्हणाले, ‘‘सानिया मिर्झाची आई नसीमा अन्य अधिकाऱ्यांसह महिला फिजिओ म्हणून भारतीय संघासोबत रिओला जाणार आहे. सानिया जगातील अव्वल टेनिसपटू असून नसीमाला तिच्यासह पाठवण्याची विनंती मान्य करण्यात आली आहे. तसेच नसीमा या महिला संघाच्या व्यवस्थापिकादेखील आहेत.’’

Web Title: Green flag showing Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.