हरित नोहा ठरला ‘सुपरक्रॉस चॅम्पियन’
By admin | Published: April 16, 2017 10:16 PM2017-04-16T22:16:55+5:302017-04-16T22:16:55+5:30
टीव्हीएस मोटर्सच्या हरित नोहाने एसएक्स-१ फॉरेन खुल्या-अ गटात बाजी मारत राष्ट्रीय सुपरक्रॉस मोटारसायकल चॅम्पियनशिप जिंकली
ऑनलाइन लोकमत
मडगाव, दि. 16 - टीव्हीएस मोटर्सच्या हरित नोहाने एसएक्स-१ फॉरेन खुल्या-अ गटात बाजी मारत राष्ट्रीय सुपरक्रॉस मोटारसायकल चॅम्पियनशिप जिंकली. केरळच्या सीडी जिनावने दुसरे तर टीव्हीएसच्या ऋग्वेद बार्गारेने तिसरे स्थान प्राप्त केले. महाराष्ट्राच्या युवराज कोंडे देशमुखने ज्युनियर गटात अव्वल स्थान प्राप्त केले. ही स्पर्धा पुणे येथील गॉडस्पिड रेसिंगतर्फे, गोवा क्रीडा प्राधिकरण आणि स्टॅलवर्ट मोटरस्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
एसएक्स-२ फॉरेन खुल्या गटात त्रिसूरच्या महेश व्ही.एम.ने प्रथम स्थान व ज्युनियर एसएक्स गटात गोव्याच्या झबिया मुलियाने बाजी मारली. स्पर्धा नावेली येथील ट्रॅकवर झाली. बक्षीस वितरणास नावेलीचे आमदार लुइझिन फालेरो, गॉडस्पिड रेसिंगचे श्याम कोठारी, सागचे कार्यकारी संचालक व्हि.एम. प्रभुदेसाई उपस्थित होते.
गटनिहाय निकाल असा : एसएक्स-१ फॉरेन खुला गट -‘अ’ : हरित नोहा- टीव्हीएस, सीडी जिनावो- केरळ, ऋग्वेद बी.-टीव्हीएस, तन्वीर ए.एम.-टीव्हीएस, सुहाली अहमद- बंगळुरू. एसएक्स-१ फॉरेन खुला गट -ब : महेश व्ही.-त्रिसूर. एम.के. मोहन - डिंडीगुल, फाबिन ज्योस- कोचीन, ज्योस डेविड-जयपूर, व्यंकटेश शेट्टी- मुंबई. क्लास फोर गट -बी : झबिया मुलिया, अंकुश राय , आदर्श के., अल्ताफ एल., अस्कर अली (सर्व गोवा). इंडियन एक्स्पर्ट ग्रुप- सी : जे. कुमार- कोईम्बतूर, आर. नारिया- टीव्हीएस, स्टिफन आर- कोईम्बतूर, महेश व्ही. एम. - त्रिसूर, सुहेल अहमद - बंगळुरू, स्टिफन राज - कोईम्बतूर, ज्योस डेविड - जयपूर, क्लास ७ एसएक्स -२ : साजित ए.एस.- त्रिसूर, पृथ्वी सिंग - चंदिगड, अदनान अहमद - मंगळुरू, एम. एस. प्रिन्स - दिल्ली, झे. खान - मुंबई, क्लास बी- जेआरएस एक्स : युवराज के. -पुणे, प्रज्वल - बंगळुरू, आपाली कुरैय्या - कोचीन, करण के. - पुणे.