गोव्यालाही ग्रीनसिग्नल

By admin | Published: October 23, 2016 03:19 AM2016-10-23T03:19:00+5:302016-10-23T03:19:00+5:30

१७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाबाबत गोव्याने केलेल्या तयारीबद्दल स्थानिक आयोजन समिती व फिफाच्या १३ सदस्यीय समितीने समाधान व्यक्त

GreenSignal | गोव्यालाही ग्रीनसिग्नल

गोव्यालाही ग्रीनसिग्नल

Next

मडगाव : १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाबाबत गोव्याने केलेल्या तयारीबद्दल स्थानिक आयोजन समिती व फिफाच्या १३ सदस्यीय समितीने समाधान व्यक्त करून गोव्याला स्पर्धा आयोजित करण्यास हिरवा कंदील दाखविला. कोची व नवी मुंबईनंतर फिफाकडून निश्चित करण्यात आलेले गोवा हे तिसरे ठिकाण ठरले आहे.
फातोर्डा येथे झालेल्या एका कार्यक्रमात फिफा समितीच्या तज्ज्ञांनी गोव्याच्या आयोजनाबाबत केलेल्या सादरीकरणाची प्रशंसा केली. यावेळी स्पर्धेचे संचालक झेवियर सेपी म्हणाले, गोव्याच्या तयारीबद्दल आम्ही पूर्ण समाधानी आहोत. पायाभूत सुविधांच्या बाबतीत गोव्याने आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. आयोजनाच्या निकषांबाबत काटेकोर अंमलबजावणीवर भर देण्याची गरज आहे. यावेळी गोव्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकर, फिफाच्या प्रकल्प अधिकारी ट्रेसी लू उपस्थित होत्या.
गेल्या फेब्रुवारीत आम्ही गोव्यातील तयारीचा आढावा घेतला होता. मधल्या सहा महिन्यांत गोव्याने भरीव कामगिरी करताना १६ वर्षांखालील एएफसी चषक फुटबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. त्यामुळे १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाबाबत अंतिम मान्यता देण्यास आम्हाला कष्ट पडले नाहीत. किंबहुना गोव्याचा तो हक्कच आहे, अशा शब्दांत ट्रेसी लू यांनी गोव्याचा गौरव केला.
यावेळी क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
फिफाच्या समितीने टिळक मैदान, काणा-बाणावली, बांबोळी स्टेडियम व उतोर्डा येथील मैदानाचीही पाहणी केली. ही तीनही ठिकाणे फुटबॉलपटूंसाठी सरावासाठी उपलब्ध असतील.
आज, रविवारी फिफाची समिती तसेच स्थानिक आयोजन समिती दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमची पाहणी करतील.

Web Title: GreenSignal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.