आनंदोत्सवात जर्मनी...!

By Admin | Published: July 16, 2014 02:28 AM2014-07-16T02:28:34+5:302014-07-16T02:28:34+5:30

किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला....अशा स्वरूपाची भावना मंगळवारी प्रत्येक जर्मन नागरिकाच्या चेहऱ्यावर दिसून आली

Greetings to Germany ...! | आनंदोत्सवात जर्मनी...!

आनंदोत्सवात जर्मनी...!

googlenewsNext

बर्लिन : किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला....अशा स्वरूपाची भावना मंगळवारी प्रत्येक जर्मन नागरिकाच्या चेहऱ्यावर दिसून आली. कारणही तसेच होते. देशाचे स्वप्न साकारणारा जगज्जेता संघ आज मायदेशी मोठ्या अभिमानाने परतला होता. या विश्वविजेत्या संघाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. दहा हजारांहून अधिक चाहत्यांची उपस्थिती पाहून संघातील प्रत्येकी खेळाडू भारावून गेला.
वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या आपल्या टीमची एक झलक पाहण्यासाठी हजारो फुटबॉलप्रेमींनी येथील ब्रेंडेनबर्ग गेटवर उपस्थिती लावली. चौथ्यांदा किताब आपल्या नावे करणाऱ्या जर्मन संघाचे सकाळी विशेष विमानाने बर्लिनमधील टेगेल या विमानतळावर आगमन झाले़ संघाचा कर्णधार फिलिप लेहम सर्वप्रथम हातात विश्वचषक घेऊन विमानातून उतरला़ त्याच्या पाठोपाठ मिडफिल्डर बॅस्टियन श्वाज्नेगर जर्मन ध्वजासह विमानातून उतरला़ विमानातून उतरलेल्या जर्मन संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यावर जेतेपद मिळविल्याचा आनंद ओसंडून वाहत होता़
विमानतळाबाहेर आल्यानंतर जर्मन संघ स्वागत समारंभाच्या स्थळाकडे रवाना झाला़ खेळाडूंचे मायदेशी आगमन होणार असल्याची खबर लागल्यानंतर अनेक महिला, पुरुष, मुले, मुली, वृद्धांनी आपल्या आवडत्या खेळाडूंचे फोटो, विश्वचषकाची प्रतिकृती हातात घेऊन रस्ते व्यापून टाकले होते़ स्वागत कार्यक्रमाला जाण्यासाठी जर्मन संघासाठी मागविण्यात आलेल्या विशेष बसवर जर्मन टीमने मिळविलेल्या जेतेपदाचे वर्ष लिहिले होते़ जर्मनीने यापूर्वी १९५४, १९७४ आणि १९९० मध्ये अजिंक्यपद मिळविले आहे़ (वृत्तसंस्था)

Web Title: Greetings to Germany ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.