सानियावर अभिनंदनाचा वर्षाव

By admin | Published: September 15, 2015 03:14 AM2015-09-15T03:14:37+5:302015-09-15T03:14:37+5:30

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध दिग्गज नेत्यांनी मार्टिना हिंगीसच्या साथीने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत जेतेपदाचा मान मिळविणारी

Greetings on Sania | सानियावर अभिनंदनाचा वर्षाव

सानियावर अभिनंदनाचा वर्षाव

Next

नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध दिग्गज नेत्यांनी मार्टिना हिंगीसच्या साथीने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत जेतेपदाचा मान मिळविणारी भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाचे अभिनंदन केले.
सानियाने स्वित्झर्लंडच्या हिंगीसच्या साथीने रविवारी अंतिम लढतीत कासे डेलाक्वा व यारोस्लाव्हा श्वेदोवा यांचा ६-३, ६-३ ने पराभव करीत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत जेतेपदाचा मान मिळवला. विम्बल्डन स्पर्धेनंतर सानियाचे हे सलग दुसरे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद असून कारकिर्दीतील पाचवे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद आहे.
केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी सानियाचे अभिनंदन करताना टिष्ट्वट केले की,‘सानिया-मार्टिना यांचे अभिनंदन. त्यांनी ऐतिहासिक कामगिरी करताना भारताची मान उंचावली.’
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सानियाचे अभिनंदन केले. ममता बॅनजी यांनी टिष्ट्वट केले की,’अमेरिकन ओपनच्या विजेतेपदासाठी सानिया-हिंगीसचे अभिनंदन.’
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी टिष्ट्वट केले,‘तू पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत जेतेपद पटकावणाऱ्या सानिया-मार्टिना यांचे अभिनंदन.’
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी टिष्ट्वट केले,‘शानदार कामगिरी. सानिया व मार्टिना यांचे अभिनंदन.’
क्रिकेटपटू आर. अश्विनने टिष्ट्वट केले,‘विम्बल्डनच्या शानदार विजेतेपदानंतर अमेरिकन ओपनमध्येही जेतेपद, ही चमकदार कामगिरी आहे. लिएंडर व सानिया यांचे अभिनंदन. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.’ मार्टिना हिंगीसच्या साथीने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावणाऱ्या सानिया मिर्झाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून महानायक अमिताभ बच्चनसह प्रियंका चोपडा, फरहान अख्तर आणि प्रीती झिंटा यांनी अभिनंदन केले. सानिया-हिंगीस जोडीने यंदाच्या मोसमात विम्बल्डन टेनिस स्पर्धेतही महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले होते. सानियाने कारकिर्दीत एकूण पाच ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे.
प्रीती झिंटाने टिष्ट्वट केले की,‘सानिया-मार्टिना यांचे अभिनंदन. मुली भारताला नवालौकिक मिळवून देत असल्यामुळे आनंद झाला.’
फराह खान,‘अशा प्रकारचे वृत्त कानावर पडणे सुखावह असते. आनंद झाला.

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत जेतेपद पटकाविणाऱ्या सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस यांचे अभिनंदन. शानदार कामगिरी.
- प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती

शानदार कामगिरीसाठी सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस यांचे अभिनंदन. तुमच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सानिया व हिंगीस यांनी अमेरिकन ओपन स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद पटकावल्यामुळे आम्हाला आनंद साजरा करण्याची संधी प्रदान केली. समालोचनामध्ये भारताचे नाव कानावर पडले म्हणजे आनंद मिळतो.
- अमिताभ बच्चन, अभिनेते

Web Title: Greetings on Sania

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.