ग्रिझमन सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू

By admin | Published: July 12, 2016 07:55 PM2016-07-12T19:55:02+5:302016-07-12T19:55:02+5:30

यजमान फ्रान्सचा स्टार खेळाडू आणि स्पर्धेत सर्वाधिक सहा गोल करणाऱ्या ग्रिझमनला युरो २0१६ च्या सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू म्हणून गौरवण्यात आले. पोर्तुगालच्या रुई पॅट्रिशियोला

Grysman Best Footballer | ग्रिझमन सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू

ग्रिझमन सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू

Next

‘युरो’चे पुरस्कार जाहीर : पोर्तुगालचा रुई पॅट्रिशियो सर्वोत्कृष्ट गोलकिपर

पॅरीस : यजमान फ्रान्सचा स्टार खेळाडू आणि स्पर्धेत सर्वाधिक सहा गोल करणाऱ्या ग्रिझमनला युरो २0१६ च्या सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू म्हणून गौरवण्यात आले. पोर्तुगालच्या रुई पॅट्रिशियोला सर्वोत्कृष्ट गोलकिपरचा बहुमान देण्यात आला.
२५ वर्षीय सडपातळ अंगकाठीच्या ग्रिझमनने या स्पर्धेत सर्वाधिक सहा गोल केले, तर दोन गोलमध्ये सहायक्काची भूमिका पार पाडली. फ्रान्सला विजेतेपदाचा मुकुट मिळवून देण्यास तो अपयशी ठरला असला तरी संघाला अंतिम फेरीपर्यंत घेवून जाण्यास त्याने मोठा वाटा उचलला. जर्मनीविरुध्द त्याने २-0 असा विजय मिळवताना त्याने दोन्ही गोल केले होते. तत्पूर्वी त्याने आयर्लंडविरुध्द राउंड १६ च्या सामन्यात दोन गोल नोंदवून संघाला २-१ ने विजय मिळवून दिला होता. ग्र्रिझमन १९८४ नंतर पहिला खेळाडू बनला आहे, ज्याने युरो स्पर्धेत सहा गोल केले आहेत. त्या स्पर्धेत मायकेल प्लाटिनीने ९ गोल केले होते. त्याच्यानंतर ग्रिझमनचा नंबर लागतो.
युफाने सेमीफायनलपर्यंत पोहचणाऱ्या चार संघातून ११ जणांचा संघ निवडला. यात विजेत्या पोर्तुगालचे ४, फ्रान्सचे २, जर्मनीचे ३ आणि वेल्सच्या २ खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डोचा यात समावेश असला तरी वेल्सचा कर्णधार गेरॉथ बॅलेचा मात्र यात समावेश नाही.

निवडण्यात आलेला संघ असा-
गोलकिपर : रुई पॅट्रिशियो (पोर्तुगाल),
डिफेंडर : जोशुआ किमिच (जर्मनी), जेरॉम बोएटेंग (जर्मनी), पेपे (पोर्तुगाल), राफेल गुएरिरो (पोर्तुगाल),
मिडफिल्डर : टोनी क्रूस (जर्मनी), जो अ‍ॅलेन (वेल्स), अँटोनी ग्रिझमन (फ्रान्स) अ‍ॅरेन रामी (वेल्स), दिमित्री पायेट (फ्रान्स)
फॉरवर्ड : ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल).

Web Title: Grysman Best Footballer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.